बँक खाती हॅक करणारी टोळी धुळे एलसीबीने पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 02:31 PM2020-10-26T14:31:21+5:302020-10-26T14:31:49+5:30

पोलीस अधीक्षक : पाच जणांमध्ये एका महिलेचा समावेश, बक्षिस जाहीर

Bank account hacking gang caught by Dhule LCB | बँक खाती हॅक करणारी टोळी धुळे एलसीबीने पकडली

बँक खाती हॅक करणारी टोळी धुळे एलसीबीने पकडली

googlenewsNext

धुळे : धुळ्यातील अ‍ॅक्सिस बँकेत धुळे विकास बँकेचे बँकेचे सुरु असलेले खाते ८ जून २०२० रोजी हॅक करुन आॅनलाईनद्वारे देशातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या १८ बँकेतील २७ खात्यांमध्ये २ कोटी ६ लाख ५० हजार १६५ रुपयांची रक्कम परस्पर वर्ग करुन फसवणूक झाल्याची घटना घडली होती़ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर समांतर तपास सुरु असतानाच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना माहिती मिळाली़ त्यानुसार तांत्रिक विश्लेषण आणि आरोपी अटक यासाठी दोन पथके तयार करण्यात आली़ दिल्ली येथून नायझेरियन एका व्यक्तीसह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले़ त्यात एक महिला आहे़ त्यांच्याकडून ५ लाख ९८ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ अशी माहिती पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली़ यावेळी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते़ संशयितांना दुपारुन न्यायालयात हजर केले जाणार आहे़

Web Title: Bank account hacking gang caught by Dhule LCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे