विद्याथ्र्याच्या श्रमातून साकारला बंधारा!
By Admin | Updated: February 1, 2017 00:02 IST2017-02-01T00:02:24+5:302017-02-01T00:02:24+5:30
झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिर नुकतेच हरणमाळ येथे पार पडले. या वेळी विद्याथ्र्याच्या श्रमातून तेथे बंधारा साकारण्यात आला.

विद्याथ्र्याच्या श्रमातून साकारला बंधारा!
धुळे : जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट संचलित झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिर नुकतेच हरणमाळ येथे पार पडले. या वेळी विद्याथ्र्याच्या श्रमातून तेथे बंधारा साकारण्यात आला.
उद्घाटन प्राचार्य डॉ.पी.एच. पवार, कर्नल उत्तम पाटील, डॉ.ललिता पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.विठ्ठल राठोड, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रियंका निकुंभ व सहकार्यक्रम अधिकारी प्रा.प्रशांत कसबे यांच्या उपस्थितीत झाले. शिबिरामध्ये विद्याथ्र्याना श्रम, संस्कार, शिस्त आणि बौद्धिक व मानसिक वृद्धीचे धडे देण्यात आले. या शिबिराचा विषय ‘स्वच्छ भारत अभियान’ होता. मुलांच्या सहभागातून बंधारा बांधण्याचे व ग्रामस्वच्छतेचे काम पार पडले. शिबिरात वेगवेगळ्या विषयांवर गटचर्चा व बौद्धिक व्याख्याने घेण्यात आली. समारोप अभिनय दरवडे यांच्या व्याख्यान व ‘व:हाड निघालं लंडनला’ या एकपात्री प्रयोगाने झाला. शिबिरासाठी संस्थेचे चेअरमन, व्हा.चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम संपन्न झाले. जिल्हा समन्वयक आर.के.जाधव यांचे शिबिरासाठी मार्गदर्शन लाभले. या शिबिरात डॉ.बी.आर.चौधरी, डॉ.भास्कर दरवडे, डॉ.एस.ए.मोरे, डॉ.आर.के.जाधव, जितेंद्र सोनवणे, प्रा.पी.एस.गिरासे यांनी मार्गदर्शन केले. तसेच या शिबिरास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा:यांचे सहकार्य लाभले.