मंदिरांमधील पारंपरिक उत्सवांवरील प्रतिबंध हटवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:24 IST2021-07-20T04:24:38+5:302021-07-20T04:24:38+5:30
निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना नजरकैद केलेले आहे. दरम्यान, बंडातात्या व वारकऱ्यांची सन्मानाने ...

मंदिरांमधील पारंपरिक उत्सवांवरील प्रतिबंध हटवावे
निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना नजरकैद केलेले आहे. दरम्यान, बंडातात्या व वारकऱ्यांची सन्मानाने मुक्तता करावी, आषाढी एकादशीपासून महाराष्ट्रातील विविध भागात विविध मठांमध्ये चालणारे चातुर्मास सेवा, मंदिरातील पारंपरिक उत्सव, वारकरी सप्ताह, कीर्तन प्रवचन, दर्शन, यावरील प्रतिबंध दूर करण्यात यावेत. ज्याप्रमाणे शासकीय कार्यालये, बसमध्ये ५० टक्के उपस्थिती आहे, तशीच परवानगी या प्रतिष्ठानांनाही द्यावी. मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांची माफी मागावी आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
निवेदनावर हेमंत थेटे, योगी दत्तानाथ महाराज, चेतन कुळकर्णी, हभप संभाजी पंडित पवार, हभप घनश्याम जोशी, बापू शिंपी, विजय विसपुते, पांडुरंग चित्ते, चंद्रकांत विसपुते, मोहित कुळकर्णी, दीपक सोनार, पांडुरंग चित्ते, योगेश बाविस्कर, विजय चौधरी, सजन जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.