धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे जीव गुदमरल्याने बालिकेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 12:09 IST2020-02-27T12:09:05+5:302020-02-27T12:09:23+5:30
शेंगदाणे खातांना ठसका लागून श्वास घेण्यास झाला त्रास

धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे जीव गुदमरल्याने बालिकेचा मृत्यू
आॅनलाइन लोकमत
शिरपूर (जि.धुळे): येथील बस आगारातील एका महिला वाहकाची लहान मुलगी शेंगदाणे खात असतांना अचानक जीव गुदमुरल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली़
२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शहरातील करवंद नाक्याजवळील हॉटेल साहेबा समोरील सोनवणे नगरात ही घटना घडली़ येथील आगारातील महिला वाहक लक्ष्मी भरत ठाकरे (३१) या परिवारासह राहतात़ त्यांचे पती भरत यादव ठाकरे हे तताणे पोक़ेरझळ ता़सटाणा जि़नाशिक येथे शेतीकाम करतात़
लक्ष्मीबाई घरी असतांना त्यांची ३ वर्षाची मुलगी सृष्टी भरत ठाकरे ही शेंगदाणे खात असतांना अचानक तिला ठसका लागला़ त्यानंतर तिचा जीव गुदमरून श्वासोश्वास घेण्यास त्रास होवू लागल्याचे लक्ष्मीबाईच्या लक्षात आले़ तोपर्यंत पूर्णपणे श्वासोश्वास घेणे बंद पडल्यामुळे त्यांनी तातडीने येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले़ मात्र डॉक्टरांनी त्या चिमुकलीला मृत घोषित करताच लक्ष्मीबाईने हंबरडा फोडला़
घटनेची माहिती येथील आगारात कळताच अनेकांनी उपजिल्हा रूग्णालयात धाव घेतली़