बाळासाहेब ठाकरेंचा पूणार्कृती पुतळा उभारा : शिवसेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 22:43 IST2021-02-15T22:43:06+5:302021-02-15T22:43:16+5:30
उपायुक्तांन निवेदन सादर

बाळासाहेब ठाकरेंचा पूणार्कृती पुतळा उभारा : शिवसेना
धुळे : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूणार्कृती पुतळा उभारण्यात यावा. यासाठी जागा आरक्षित करून महासभेत ठराव मंजूर करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली. उपायक्त गणेश गिरी यांना निवेदन देण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात नव्हेतर संपूर्ण भारत देशातील जनतेला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्यपणास लावलेले आहे. त्यांच्या कायार्चा आदर्श येणाऱ्या भावी पिढीस यावा यासाठी त्यांचा पूणार्कृती पुतळा शहरात उभारण्यात यावा, यासाठी संतोषी माता मंदिरासमोरील महापालिका हद्दीतील जुने जिल्हा रुग्णालय साक्री रोडवरून बसस्थानकाकडे जाणाऱ्या व्ही आकाराची जागा निश्चित करण्यात यावी. तसेच या जागेबाबत लवकात लवकर महासभेत ठराव ठेवून मंजूर करण्यात यावा, अशी मागणी निवेदनद्वारे करण्यात आली आहे.
उपायुक्त गणेश गिरी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी, किरण जोंधळे, डॉ. सुशील महाजन, प्रफुल्ल पाटील, मनोज मोरे, राजेश पटवारी, संजय जवराज आदी उपस्थित होते.