पावसामुळे अकलाड रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 14:59 IST2020-08-05T14:59:02+5:302020-08-05T14:59:23+5:30
नेर : जि.प. सदस्या मनिषा खलाणे यांनी स्वखर्चातून केली दुरुस्ती

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : पावसामुळे दुरवस्था झालेल्या अकलाड येथील मुख्य रस्त्याची जिल्हा परिषद सदस्या मनिषा खलाणे यांनी स्वखर्चातून दुरुस्ती केली आहे. यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
धुळे तालुक्यातील अकलाड येथे मुसळधार पाऊस झाल्याने गावातील मुख्य रस्ता वाहून गेला होता. या रस्त्यावरुन दररोज शेतकरी, नागरिकांची ये-जा सुरु असते. मात्र, रस्त्याची दुरवस्था झाल्याने शेतकऱ्यांच्या बैलगाडी, दुचाकी व पायी जाणाºया नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
याबाबत येथील नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्या मनिषा शंकरराव खलाणे यांच्याकडे रस्ता दुरुस्ती करून देण्याची मागणी केली होती. ग्रामस्थांच्या अडचणी लक्षात घेऊन खलाणे यांनी दगड, माती, मुरूम यांचा वापर करुन जेसीबी यंत्राच्या सहाय्याने एका दिवसात हा रस्ता स्वखर्चातून दुरुस्त करून दिला आहे. त्याचप्रमाणे महिला शौचालयाकडे जाणारा रस्त्याचीही दुरुस्ती केली.
या प्रसंगी नेरचे सरपंच शंकरराव खलाणे, अकलाडचे माजी सरपंच तुकाराम सूर्यवंशी, महादू माळी, अमोल माळी, कुणाल माळी, भैय्या माळी, शिवराम माळी, बापू चव्हाण, शाखा अभियंता महाजन, संतोष खलाणे, निंबा सूर्यवंशी व ग्रामस्थ उपस्थित होते.