तीन महिन्यानंतर आयुक्तपदी अजीज शेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 22:47 IST2019-09-13T22:46:50+5:302019-09-13T22:47:09+5:30
सोमवारी पदभार स्विकारणार

dhule
धुळे : तब्बल सव्वा तीन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर मनपाच्या आयुक्तपदावर नागपुर महापालिकेचे उपायुक्त अजिज शेख यांच्या नियुक्तीचे आदेश शुक्रवारी प्राप्त झाले.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ३६ नुसार शासनाचे सहसचिव सं. श. गोखले यांच्या स्वाक्षरीने अजिज शेख यांच्या नियुक्तीचे आदेश पारित झाले आहे़ आयुक्त शेख यांची प्रशासकीय कारणास्तव नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांना तातडीने पदभार स्विकारण्याचे आदेश देण्यात आले आहे़
तत्कालिन आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या बदलीनंतर काहीकाळ तत्कालिन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्याकडे आयुक्त पदाचा पदभार सोपविण्यात आला होता़ सध्या विद्यमान जिल्हाधिकारी डी़ गगांथरण यांच्याकडे सोपविण्यात आला होता़
नवनियुक्त आयुक्त शेख सोमवारी पदभार स्विकारणार असल्याची माहिती मनपाच्या सुत्राकडून देण्यात आली़