डीजीटल बॅनरद्वारे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 21:58 IST2020-06-01T21:57:44+5:302020-06-01T21:58:02+5:30
आरोग्य विभाग : कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायांची माहिती

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत डीजीटल बॅनर लावून कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे़ जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र परिसरात असे बॅनर लावण्यात आले आहेत़ लॉकडाउन झाल्यापासुन लावलेल्या या बॅनरमुळे ग्रामीण भागात प्रभावी जनजागृती झाली़ जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या संरक्षक भिंतीला दर्शनी भागातही अशा प्रकारचे बॅनर लावल्यामुळे सर्वसामान्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती सोप्या भाषेत देण्यात आली आहे़