राज्यपालांच्या हस्ते महिला बचत गटाला पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:25 IST2020-02-03T12:24:44+5:302020-02-03T12:25:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होत आहे. महिलांनीही आता बचतगटाच्या चळवळीत सहभागी होऊन ...

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होत आहे. महिलांनीही आता बचतगटाच्या चळवळीत सहभागी होऊन आपला विकास साधत उद्योग-व्यवसायांचे मालक बनले पाहिजे. अशी भावना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे व्यक्त केली.
यावेळी तालुक्यातील पाडळदे येथील ओमसाई स्वयंसहाय्यता समूहाला राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते नाशिक विभागस्तरीय राजमाता जिजाऊ स्वावलंबन प्रथम पुरस्कार देऊन गटातील सर्व महिलांचा गौरव करण्यात आला. राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आला. प्रदर्शनात महाराष्ट्रासह २९ राज्यांतील बचतगट सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माविमच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, आमदार रमेश पाटील, असीम गुप्ता, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, आर. विमला उपस्थित होते.
प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल धुळे गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, तालुका अभियान व्यवस्थापक एम डी सोनावणे, हेमंत गवते, अमोल वाघ अभिनंदन केले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., जिल्हा, बी मोहन , त्रिवेणी भोंदे, उद्धव धारणे, जितेंद्र चौधरी, लोकेश सोनवणे, दिपाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
विभागात प्रथम....
तालुक्यातील पाडळदे येथील ओमसाई बचत गटाने गाव हागणदारी मुक्त करणे, पाणी फौंडेशन मध्ये उल्लेखनीय कामगिरी, बचत गटातून व्यवसाय व विक्री, आरोग्य, स्वच्छतेवर नियमित जनजागृती आदी विविध उपक्रम राबवित नाशिक विभागात प्रथम क्रमाक मिळविल्याने त्यांच्या राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आला.