दिव्यांग विद्यार्थ्याला हस्तकलेत पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 18:32 IST2020-01-31T18:31:37+5:302020-01-31T18:32:36+5:30
कौतुकास्पद : अरहम नॅशनल अॅवार्डने सन्मानित; सर्वत्र कौतुक

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तालुक्यातील नगाव येथील संदीप कैलास वानखेडकर या दिव्यांग विद्यार्थ्याला हस्तकला या नाविन्यपूर्ण उपक्रमात अरहम नॅशनल अॅवार्ड मिळाला आहे़ पुणे येथे झालेल्या एका समारंभात त्याला आ़ दत्तात्रय बाणोरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला़ त्याला शिक्षिका आशा शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले़ संस्थेचे अध्यक्ष शशिकांत भदाणे, सचिव स्वप्निल भदाणे, खजिनदार अक्षय भदाणे, मुख्याध्यापिका शितल पाटील, भारती सोनवणे, लिपिक शिवाजी जाधव यांच्यासह शिथक, शिथकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे़