धुळे - येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रविवारी १७ रूग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १५ रूग्णांचे स्वब घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील २३८ रूग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे तर २०५३ रूग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तसेच १७ अहवाल प्रतिक्षेत आहेत. रविवारी जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन रूग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांमध्ये एक पोलीस कर्मचारी व एका टपाल कर्मचा?्याचा समावेश आहे. पोलीस कर्मचा?्याचे पोलीस ब?ण्ड पथकाने वाद्य वाजवून स्वागत केले. यावेळी पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित व सहाय्यक पोलीस अधिक्षक उपस्थित होते.
हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील १७ अहवालांची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 16:44 IST