शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

दिवसभरात 1200 चिमुकल्यांचे जाऊळ

By admin | Updated: April 11, 2017 00:25 IST

चैत्रोत्सव : भाविकांच्या गर्दीने फुलला मंदिर परिसर; आज पालखी मिरवणूक; मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

धुळे :  खान्देश कुलस्वामिनी एकवीरादेवी यात्रोत्सवास थाटात प्रारंभ झाला. यानिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सोमवारी दिवसभरात 1200 चिमुकल्या मुलांचे जाऊळ काढण्यात आले. तसेच कुळधर्म, कुलाचारासाठी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी झाली होती. भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलल्याचे चित्र दिसून आले. सालबादप्रमाणे यंदाही एकवीरादेवीचा यात्रोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जात आहे. यावर्षी चतुर्दशीच्या दोन तिथी आल्यामुळे काही भाविकांनी रविवारी त्यांच्या मुलांचे जाऊळ काढले; तर आज चतुर्दशीचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे खान्देशातून अनेक भाविक त्यांच्या मुलांचे जाऊळ काढण्यासाठी मंदिर परिसरात सकाळपासूनच दाखल झाले होते. जाऊळ काढण्यासाठी मुलांची एकच गर्दी झाल्यामुळे मंदिर परिसरात नाभिकांची बरीच शोधाशोध करावी लागली. आज पालखी मिरवणूक एकवीरादेवी भगवतीची पालखी व शोभायात्रा मंगळवारी, 11 रोजी दुपारी चार वाजता काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेची सुरुवात मंदिरापासूनच होणार आहे. पारंपरिक मार्गावरून शोभायात्रेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत विविध शाळेतील विद्यार्थी लेझीम व पारंपरिक नृत्य सादर करणार आहे. या मिरवणुकीत वारकरी संप्रदायाचे पथकही राहणार आहे. तत्पूर्वी मंदिर संस्थानचे मुख्य ट्रस्टी सोमनाथ गुरव यांच्या हस्ते महाअभिषेक व पाद्यपूजेचा कार्यक्रम होणार आहे. या वेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर कल्पना महाले, स्थायी समिती सभापती कैलास चौधरी, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, मनपा आयुक्त संगीता धायगुडे, जिल्हा पोलीस अधीक्षक चैतन्या एस.  उपस्थित राहणार आहेत. दहा दिवस चालणार यात्रोत्सव कुलस्वामिनी एकवीरादेवीचा यात्रोत्सव दहा दिवस चालणार असल्याची माहिती एकवीरादेवी व रेणुकामाता मंदिर ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे. यानिमित्ताने यात्रोत्सवाच्या काळात मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. मंदिर ते पंचवटीर्पयत थाटली विक्रेत्यांनी दुकाने एकवीरादेवी मंदिर ते पंचवटीर्पयत विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहे. या दुकानांच्या मागे पांझरा नदी पात्रात बच्चे कंपनीसाठी आकर्षण ठरणारे पाळणे व मनोरंजनाची साधने राहणार आहेत. प्रत्यक्षात मंगळवारपासून पाळण्यात बसण्याची मजा बच्चे कंपनीला लुटता येणार आहे. गेल्यावेळी पाळण्यात बसण्याचे जे शुल्क आकारले जात होते. तेच शुल्क यावर्षीही घेतले जाणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे.