सीए शाखेच्या अध्यक्षपदी अविनाश घुंडीयाल तर सचिवपदी रचेंद्र मुंदडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:08 IST2021-03-04T05:08:11+5:302021-03-04T05:08:11+5:30
धुळे : दिल्ली येथील दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागीय मंडळाच्या धुळे शाखेच्या वर्ष २०२१-२०२२साठीच्या नूतन ...

सीए शाखेच्या अध्यक्षपदी अविनाश घुंडीयाल तर सचिवपदी रचेंद्र मुंदडा
धुळे : दिल्ली येथील दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागीय मंडळाच्या धुळे शाखेच्या वर्ष २०२१-२०२२साठीच्या नूतन कार्यकारिणीची निवड नुकतीच करण्यात आली. या कार्यकारिणीमध्ये सीए अविनाश घुंडीयाल यांची अध्यक्ष म्हणून तसेच उपाध्यक्ष व खजिनदार म्हणून सीए नीलेश किशोर अग्रवाल आणि सचिव व धुळे विकासाचे अध्यक्ष म्हणून सीए रचेंद्र लोकेंद्र मुंदडा यांची निवड करण्यात आली. या कार्यकारिणीला मावळते अध्यक्ष सीए नीलेश जी अग्रवाल यांनी पदभार हस्तांतरित करून शुभेच्छा दिल्या. धुळे येथील शाखेत चार्टर्ड अकौंटंट सदस्यांसाठी विविध सेवा पुरविण्यात येतात तसेच विद्यार्थ्यांसाठी पूर्णवेळ वातानुकुलित वाचनालयाची सोय करण्यात आली आहे. सीए सदस्यांना व विद्यार्थ्यांना लागणारी विविध पुस्तके येथील वाचनालयामध्ये विक्रीसाठी व वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. गेल्या सात वर्षांपासून धुळ्यात सीएची परीक्षा देण्याची सुविधाही उपलब्ध आहे तसेच सीएच्या विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले आयटीटी ओरिएंटेशन व एमसीएस अभ्यासक्रमही धुळ्यात उपलब्ध आहेत. या कार्यक्रमाला माजी अध्यक्ष सीए व्ही. सी. अग्रवाल, सीए जयेश गौड, सीए राजाराम कुलकर्णी व अन्य सीए उपस्थित होते. नूतन अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचे सर्वांनी अभिनंदन केले.