यंदा सरासरी पाऊस होईल नक्षत्रांचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 22:32 IST2020-07-19T22:32:12+5:302020-07-19T22:32:28+5:30
हवामानशास्त्र अनुसार पावसाचा अंदाज वर्तवला जातो मात्र हा अंदाज बांधताना अनेकदा तफावत आढळत असते अनेक वेळा हे अंदाज चुकीचे ...

dhule
हवामानशास्त्र अनुसार पावसाचा अंदाज वर्तवला जातो मात्र हा अंदाज बांधताना अनेकदा तफावत आढळत असते अनेक वेळा हे अंदाज चुकीचे ठरतात. मात्र शेतकऱ्यांना अवगत असलेले प्राचीन ज्ञान सहसा चुकीचे ठरत नाही.या पंचाग शास्त्र नुसार नक्षत्रावरून पावसाचा अंदाज वर्तवला जातो व अनेक वेळा शेतकरी या अंदाजा वरून पेरणी देखील करत असतात. या पर्जन्य नक्षत्रांच्या तारखा व नक्षत्रांची वाहने याचा अभ्यास करून यंदा सरासरी इतका पाऊस पडेल, असा अंदाज दाते पंचांगात वर्तवली असल्याची माहिती प्रकाशा येथील पुरोहित वसंत कुळकर्णी यांनी दिली.
पर्जन्यनक्षत्रे आणि त्यांची वाहने याबद्दलही सखोल माहिती दिली आहे. १९ जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज होता
पुष्य नक्षत्र - १९ जुलै रविवारी रात्री १० वाजून ३६ मिनिटांनी सूर्य पुष्य नक्षत्री प्रवेश करतो.पर्जन्यसूचक हत्ती हे वाहन आहे. १४ जुलैच्या रवि गुरु प्रतियुतीचा परिणाम म्हणून या नक्षत्राचा दमदार पाऊस होईल कांही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. २० ते २४ जुलै आणि एक आॅगस्टला पाऊस अपेक्षित असल्याचे दाते पंचांगात पर्जन्य विचार मांडण्यात आला आहे.
आश्लेषा नक्षत्र - २ आॅगस्ट ते १६ आॅगस्ट या काळात आश्लेषा नक्षत्र असून याचे वाहन मेंढा आहे. या काळात पाऊस ओढ धरून पर्जन्यमान सुधारेल.
मघा नक्षत्र - १७ ते ३० आॅगस्ट या काळात मघा नक्षत्र आहे. याचे वाहन म्हैस असल्याने काही भागात अतिवृष्टी पाऊसाची शक्यता आहे.
पूर्वा फाल्गुनी नक्षत्र - ३० आॅगस्ट ते १२ सप्टेंबर या काळात पूर्वा फाल्गुनी नक्षत्र असून बेडूक त्याचे वाहन आहे, या काळात कमी पाऊस होईल.
उत्तरा फाल्गुनी नक्षत्र - १३ ते २६ सप्टेंबर या कालावधीमध्ये उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचे वाहन मोर आहे. या काळात पाऊस विखुरला जाऊन काही भागात चांगला पाऊस होईल.
हस्त नक्षत्र - २७ सप्टेंबर ते १० आॅक्टोबर हस्त नक्षत्राचे वाहन घोडा आहे. हस्त नक्षत्राचा पाऊस समाधान कारक होईल.
चित्रा आणि स्वाती नक्षत्रे- आॅक्टोबर महिन्यात चित्रा आणि स्वाती नक्षत्रे असून यांची वाहने बेडूक आणि म्हैस आहेत. शेवटच्या चरणात मुसळधार पावसाचे योग आहे.
दा.कृ.सोमण यांचा पंचाग नुसार सूर्य ज्या नक्षत्रात प्रवेश करील, त्या नक्षत्रापासून प्रवेशकालीन चंद्रनक्षत्रापर्यंत नक्षत्रसंख्या मोजून त्याला नऊने भागावे. बाकीवरून वाहने ठरवण्यात येतात. शून्य बाकी राहिली तर हत्ती वाहन असते. १ घोडा, २ कोल्हा, ३ बेडूक, ४ मेंढा, ५ मोर, ६ उंदीर, ७ म्हैस, ८ गाढव अशी वाहने ठरवण्यात येतात,. बेडूक, म्हैस आणि हत्ती वाहन असताना खूप पाऊस पडतो. मोर, गाढव, उंदीर वाहन असताना अनियमित आणि कमी पाऊस पडतो. कोल्हा आणि मेंढा वाहन असताना अल्प पाऊस पडतो, तर घोडा वाहन असताना पर्वतावर पाऊस पडतो, असे सांगण्यात येते. पंचांगातील पावसाचे अंदाज हे केवळ ठोकताळे असतात. अनेक वर्षांपूवीर्पासून हे ठोकताळे बांधण्यात येतात.