The audit report should be submitted within three days | लेखापरीक्षणाचा तीन दिवसात अहवाल सादर करावा

dhule

धुळे : लेखापरीक्षणात भांडार विभागाचे ९, आरोग्य विभागाचे ६, लेखा, बांधकाम, मालमत्ता कर, नगरसचिव, नगररचना विभागाचे प्रत्येकी पाच, बाजार, लेखापरीक्षण, वाहन विभागाचे प्रत्येकी ३, शिक्षण मंडळ, एलबीटी विभागाचे प्रत्येकी २, वृक्ष, अतिक्रमण विभागाचा प्रत्येकी एक आक्षेप घेण्यात आला आहे. या विभागांची तीन दिवसात अहवाल सादर करावा अशा सुचना आयुक्त अजिज शेख यांनी बैठकीत दिल्या.
महापालिकेच्या सन २०१४-१५ या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षणात विविध विभागांचे १५० आक्षेप नोंदवण्यात आले आहे. त्यात सर्वाधिक आक्षेप सामान्य प्रशासन विभागाचे आहेत. या आक्षेपांचे अनुपालन करून त्यांची पूर्तता करावयाची होती. मात्र, अद्याप पूर्तता झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आयुक्त अजिज शेख यांनी खातेप्रमुखांची बैठक घेऊन तीन दिवसांच्या आता अहवाल सादर करण्याचे आदेश विभागप्रमुखांना दिले आहे.
औरंगाबाद येथील लेखापरीक्षण विभागाकडून महापालिकेचे सन २०१४-१५ व २०१५-१६ या आर्थिक वर्षांचे लेक्षापरीक्षण करण्यात येत आहे. त्यानुसार सन २०१४-१५ या वर्षाच्या लेखापरीक्षणात १५० आक्षेप नोंदवण्यात आले आहे. याविषयीची माहिती विभागप्रमुखांना देण्यात आली आहे. विभागप्रमुखांनी आक्षेपांची पूर्तता करून लेखापरीक्षण विभागाला कळवणे अपेक्षित आहे; परंतु अद्याप आक्षेपांची पूर्तता झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त अजिज शेख यांनी याविषयाचा आढावा घेण्यासाठी विभागप्रमुखांची बैठक घेतली. तसेच आक्षेपाबाबत पूर्तता करण्याच्या सूचना केली आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली आहे. काम पूर्ण झाल्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार विभाग प्रमुखांनी कार्यवाही सुरू केली आहे. लेखा परीक्षणात नोंदवण्यात आलेल्या आक्षेपांमध्ये गैरव्यवहार किंवा आर्थिक अनियमिततेची प्रकरणे नसली तरी प्रशासकीय अपूर्णतेच्या प्रकरणांचा समावेश आल्याची माहिती देण्यात आली.

Web Title: The audit report should be submitted within three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.