आर्थिक तरतूद केल्याने अंमलबजावणीकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 23:44 IST2020-02-06T23:43:33+5:302020-02-06T23:44:20+5:30
मनमाड इंदूर रेल्वेमार्ग : अर्थसंकल्पात तरतूद

आर्थिक तरतूद केल्याने अंमलबजावणीकडे लक्ष
धुळे : मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव अशी तरतूद केली आहे़ ही समाधानाची असतानाच त्याची तातडीने अंमलबजावणी व्हावी़ कामे सुरु केल्यास खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा विकास शक्य आहे, अशा संमिश्र प्रतिक्रिया विविध राजकीय पक्ष आणि प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींकडून व्यक्त झाल्या़
ही समाधानाची बाब
मनमाड इंदूर रेल्वेमार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यरेल्वेला आर्थिक तरतूद केली असल्याने ही समाधानाची बाब आहे़ यानिमित्ताने का असेना विकास कामाला सुरुवात होत आहे़ यापुर्वीच भूमीपूजन झाले असल्याने काम मार्गी लागेल असा विश्वास आहे़
- मदनलाल मिश्रा
सातत्याने मागणी होती
मनमाड इंदूर रेल्वेमार्गासाठी सातत्याने मागणी करण्यात आली़ त्यासाठी वेळोवेळी पदाधिकाऱ्यांसह अधिकाºयांना निवेदन देखील देण्यात आले़ पण, त्याची पुरेशा प्रमाणात दखल घेतली जात नव्हती़ उशिरा का असेना त्याचे महत्व आता जाणून घेतले जात आहे़ या मार्गाचे महत्व जाणून घ्यायला हवे़
- मोहन जाधव
अखेर शब्द पाळला
भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाºयांनी मनमाड इंदूर रेल्वे संदर्भात शब्द दिला होता, त्यासाठी केंंद्राकडे वेळोवेळी पाठपुरावा देखील करण्यात आला़ त्याचा हा परिणाम असून अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली़ टप्या-टप्प्याने हा विषय मार्गी लागेल, असा विश्वास आहे़ तरतूद केल्यामुळे ही बाब कौतुकास्पद आहे़
- बबन चौधरी
या हवेतल्या वार्ता
मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी केंद्राने केलेली आर्थिक तरतूद ही विकासाच्या बाबतीत आनंदाची म्हणावी लागेल़ गेल्या सहा वर्षापासून हेच ऐकत आहोत़ रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण झाले आहे की नाही? तसेच धुळे आणि मनमाड या ठिकाणचे उद्घाटन करण्यात आले यामागील हेतू काय? रेल्वे मार्गाच्या संदर्भात जोपर्यंत अंतिम कागद, कार्यवाही होत नाही तोपर्यंत या वार्ता हवेतल्या हवेत असल्याचे स्पष्ट आहे़
- श्यामकांत सनेर
तरतूद अनेकवेळा ऐकली
मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी आर्थिक तरतूद हा विषय आजवर अनेकवेळा ऐकला गेला आहे़ या मार्गाचे भूमीपूजन करण्यात आले़ लवकरच रेल्वे धावणार असे सांगण्यात आले़ तरतूद करुन कामाला सुरुवात केली जाणार असेल तर आम्ही केंद्र सरकारचे अभिनंदन करु़
- हिलाल माळी