मेळाव्याला जाणा:या वाहनाला अपघात, 6 शेतकरी गंभीर
By Admin | Updated: May 19, 2017 17:53 IST2017-05-19T17:53:33+5:302017-05-19T17:53:33+5:30
मुंबई- आग्रा महामार्गावरील आर्वी जवळील चिखलहोळ गावाजवळ अपघात झाला़

मेळाव्याला जाणा:या वाहनाला अपघात, 6 शेतकरी गंभीर
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 19 - नाशिक येथे शेतकरी कर्जमुक्ती मेळाव्याला जाणा:या वाहनाला शुक्रवारी सकाळी मुंबई- आग्रा महामार्गावरील आर्वी जवळील चिखलहोळ गावाजवळ अपघात झाला़ त्यात अजंग येथील सहा शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत़ त्याच्यावर धुळे शहरातील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़
नाशिक येथे शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी कर्जमुक्ती मेळावा होता़ त्यासाठी अजंग येथील काही शेतकरी कारने मेळाव्याला जात असताना चिखलहोळ गावाजवळ वाहनचालकाचा ताबा सुटल्याने कारचा अपघात झाला़ त्यात शिवाजी पितांबर माळी, मनोहर सुरेश माळी, श्रीराम राजाराम माळी, हिरचंद्र सुरेश माळी यांच्यासह सहा जण जखमी झाल़े
सहाही शेतक:यांची प्रकृती स्थिर असून शिव आरोग्य सेनेच्या प्रदेशाध्यक्षा व सहसंपर्क प्रमुख डॉ़ माधुरी बोरसे यांनी परदेशातून व महानगर प्रमुख सतीश महाले यांनी निरामय हॉस्पिटल येथे भेट देऊन आस्तेवाईकपणे विचारपूस केली़