लग्नाचे आमिषाने धुळ्यासह पिंपळगावला मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 22:06 IST2019-08-02T22:06:38+5:302019-08-02T22:06:53+5:30
चौघांविरुध्द गुन्हा : संशयित फरार

लग्नाचे आमिषाने धुळ्यासह पिंपळगावला मुलीवर अत्याचार
धुळे : एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर धुळ्यातील श्री स्वामी समर्थ चौक आणि पिंपळगाव नाशिक येथे अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे़ पीडित मुलीने त्यांच्या तावडीतून सुटका करीत पोलीस ठाणे गाठले आणि चौघांविरुध्द गुन्हा दाखल केला़
एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी गोड बोलून एका महिलेने तिला आपल्या घरी नेले़ तेथून तिला जबरदस्तीने रिक्षामध्ये बसवून धुळे बसस्थानकात आणले़ यानंतर नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथे तिले आणले़ याठिकाणी तिला आणून घरात डांबून ठेवण्यात आले़ यावेळी तिच्यावर दोन वेळा अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे़
ही घटना ३ जुलै २०१९ रोजी सकाळी ८ ते १७ जुलै २०१९ रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान घडली आहे़
या मुलीने आपली कशीतरी त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करुन घेत शहर पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दिली़ त्यानुसार संशयित सुनील प्रल्हाद कांबळे, अर्जुन प्रल्हाद कांबळे, निलाबाई प्रल्हाद कांबळे आणि सरलाबाई (पूर्ण नाव माहित नाही) (सर्व रा़ गणेश कॉलनी, साक्री रोड, धुळे) यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला़ दरम्यान, या प्रकरणातील संशयित फरार झालेले आहेत़