शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘पन्नास खोके, एकदम ओके’च्या घोषणा देत मंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न

By चंद्रकांत भगवान सोनार | Updated: September 30, 2022 23:05 IST

या आंदोलनामुळे सुरत नागपूर महामार्गावर काहीकाळ वाहतूककोंडी निर्माण झाली होती.

धुळे :  शहरातील सैनिक लॅान्स‌ येथे शिंदे गटाचा हिंदू गर्व गर्जना मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील शुक्रवारी सायंकाळी धुळे दौऱ्यावर आले होते. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या वाहनाच्या ताफ्याला अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसैनिकांनी ‘पन्नास खोके, एकदम ओके’च्या घोषणा दिल्या. यावेळी त्यांना अटक करून सुटका करण्यात आली.

सुरत- नागपूर महामार्गावरील कृषी महाविद्यालयाजवळ मंत्री गुलाबराव पाटील यांचे वाहन अडविण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगर प्रमुख धीरज पाटील आदींनी ‘पन्नास खोके, एकदम ओके’च्या घोषणा देत उभे होते. या आंदोलनाची माहिती पोलिसांनी मिळताच तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल होऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक केली. 

या आंदोलनामुळे सुरत नागपूर महामार्गावर काहीकाळ वाहतूककोंडी निर्माण झाली होती. या आंदोलनात जिल्हा समन्वयक कैलास पाटील, नाना वाघ, विनोद जगताप, पुरुषोत्तम जाधव संजय जवराज, संदिप सुर्यवंशी, प्रविण साळवे, शरद गोसावी, मच्छिंद्र निकम, आबा भडागे, भैय्यासाहेब बागुल, छोटुभाऊ माळी, देवराम माळी, भटू गवळी, प्रकाश शिंदे, कुणाल कानकाटे, सुनिल चौधरी, कैलास मराठे, आबा हरळ, अजय चौधरी, दीपक गोरे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलDhuleधुळे