तिघांचा खून करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 12:24 IST2020-05-14T12:23:46+5:302020-05-14T12:24:05+5:30

गरीब नवाज नगर : ११ संशयितांविरुध्द दंगलीचा गुन्हा

Attempted murder of three | तिघांचा खून करण्याचा प्रयत्न

dhule

धुळे : येथील गरीब नवाज नगरात एका जमावाने प्राणघातक हल्ला करीत तिघांचा खून करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता़ या हल्ल्यामुळे दहशत निर्माण झाल्याने एक दिवस उशिरा फिर्याद दाखल झाली़
पूर्व हुडकोतील रहिवासी हाशिम पिंजारी ऊर्फ पापा गोल्डन याचे शाहरुख शेख याच्याशी होत असलेले भांडण सोडविण्याचा राग आल्याने हाशिम पिंजारीने गावठी कट्ट्याचा धाक दाखवून दमदाटी केली़ शेख शकील शेख हुसैन याने अब्दुल हमीद ऊर्फ भुऱ्या केलेवाला याला लोखंडी टॅमीने डोक्यात मारुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला़ तसेच तलवार फिरवून धमकी दिली़ इतर संशयितांनी साजीद सैय्यद आणि फिरोजा बी या महिलेच्या अंगावर काचेच्या बाटल्या, दगडांचा मारा करुन जखमी केले़ या हल्ल्यात अब्दुल हमीद ऊर्फ भुºया केलेवाला, साजिद सैय्यद, फिरोजा बी हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत़
या जमावाने गरीब नवाज नगरातील नाल्याच्या पुलावरील सार्वजनिक जागी दंगल आणि दहशत माजविली़ ११ मे रोजी रात्री दहाच्या सुमाराला घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता़
दरम्यान, याप्रकरणी अमीन अहमद नजीर अहमद (४५) याने दिलेल्या फिर्यादीवरुन हाशिम हारुन पिंजारी, शेख शकील शेख हुसैन, बाली चोर, शोएब ऊर्फ बाबु हारुन पिंजारी, हारुन मन्सुरी ऊर्फ भंगारवाला, शाहरुख हारुन पिंजारी, अरशद शेख अश्पाक, आवेश शेख अश्पाक, सद्दाम सैय्यद, गुलाब शहा यांचा मुलगा, सईद फावड्या सर्व रा़ पूर्व हुडको या ११ जणांविरुध्द १२ मे रोजी सायंकाळी पाच वाजता चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०७, ३३६, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६, आर्म अ‍ॅक्ट ३/२५, ४/२५ आणि मुंबई प्रोव्हीजन कायदा कलम ३७ (१) (३), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रकाश मुंडे करीत आहेत़
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, पोलीस निरीक्षक प्रकाश मुंडे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली़ तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले़ संशयितांना अजुन अटक केली नाही़

Web Title: Attempted murder of three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे