शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

हा तर ग्राहक लुटीचा वीज मंडळाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 10:51 PM

आरोप : वीज कायदा व नियामक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मीटरचे सील व अन्य बाबीवरुन ग्राहकाने मीटरमध्ये काहीही फेरफेर केलेला नाही याचा पंचनाम्यात उल्लेख असताना मीटर हे सदोष असल्याचे दाखवून अवास्तव बील आकारण्यात आले़ यावरुन ग्राहकाची लूट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राज्य वीज ग्राहक संघटनेने केलेला आहे़ वीज कायदा व वीज नियामक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन असल्याचे समोर आले आहे़ देवपूर विभागाच्या भरारी पथकाने २६ नोव्हेंबर २०१८ रोजी वाडीभोकर रोडच्या पंडीत लिला कॉम्प्लेक्समध्ये व्यवसाय करणाºया एका ग्राहकाच्या मीटरची तपासणी करण्यात आली़ मीटर हळू चालत असल्याचे कारण दाखवून मागील १८ महिन्यांचे ८ लाख रुपयांच्या थकबाकीचे बिल दिले़ ग्राहकास गेली चार वर्ष जे बील येत आहे, त्याच पध्दतीने आताही बिल येत होते़ पण, वीज मंडळाने मागील १९ महिन्यांपासून मीटर सदोष आहे हे दाखवून चुकीचे व आवास्तव बिल आकारले़ सदरहू ग्राहकाने वीज बिल का जास्त आले याकरीता वीज मीटरच्या नोंदी संबंधिचे एमआरआय रिपोर्टची सातत्याने मागणी केली़ परंतु वीज मंडळाने ती दिलेली नाही़ परिणामी विजबिल चुकीचे व अवास्तव आहे असे संघटनेला वाटत आहे़ विजेचे बिल न भरल्याने ग्राहकाचा वीज पुरवठा ६ मार्च २०१९ रोजी वीज कायदा २००३ चे कलम ५६ व १७१ चे उल्लंघन करुन खंडीत करण्यात आले़ वीज तोडण्यापुर्वी ग्राहकाला तशी नोटीस द्यावी लागते़ तसेच तशी सुचना बिलामध्ये नमूद न करता स्वतंत्रपणे ग्राहकास पोहचविली जावून त्याच्याकडून ती मिळाल्याची पोचपावती घेतली जाणे आवश्यक आहे़ ग्राहकास चुकीचे व अवास्तव बिल दिल्यास वीज कायदा २००३ मधील कलम ५६ नुसार वीज बिलांची मागील सहा महिन्यांची सरासरी रक्कम अथवा चुकीचे पूर्ण बिल यापैकी जी रक्कम कमी असेल ती भरली असता ग्राहकाचा वीज पुरवठा तोडता येत नाही़ कायद्यात तशी तरतूद असताना बिलाची तक्रार करायला ग्राहक स्थानिक कार्यालयात गेल्यावर त्याला अगोदर बिलाची पूर्ण रक्कम भरायला भाग पाडले जाते़ मुळात हे चुकीचे आहे़ महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनीकर यांच्याशी चर्चा केल्यावरही त्यांनी योग्य प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे़ ग्राहकाचे रोज १५ हजाराचे नुकसान भरुन देणार का? असा सवाल उपस्थित होत आहे़नुकसान भरपाई महावितरणने द्यायला हवीवीज मंडळाच्या भरारी पथकाने दोन दिवसांपुर्वी दिलेल्या तीन महिन्यांच्या एमआरआय रिपोर्टवरुन वीज मिटर हळू चालते असे सिध्द होत नाही़ पण, गेल्या १९ महिन्यांचा एमआरआय रिपोर्ट द्यायला असमर्थता का दाखविली जाते याचे कारण कळत नाही़ अवास्तव व चुकीचे विजबिल देण्याची पध्दत म्हणजेच ग्राहकाची लूट करण्याचा प्रयत्न आहे़ यासंदर्भात संबंधित अधिकाºयांनी आपली चूक मान्य करुन संबंधित ग्राहकाचा वीज पुरवठा त्वरीत चालू करावा, होणारी नुकसान भरपाई स्वत:च्या खिशातून भरुन द्यावी़ असे वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रा़ शाम पाटील, सचिव वर्धमान सिंघवी यांचे म्हणणे आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे