नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यासह दोघांवर हल्ला, पावणेचार लाख लुटले : १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:39 IST2021-08-19T04:39:42+5:302021-08-19T04:39:42+5:30
अजनाडे येथील सुरेश भोसले आणि मुकेश भाेसले या दोघांनी काॅपरतार विक्री करण्याचे आमिष दाखवून मोहम्मद आरीफ सलीम पटेल (२८, ...

नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यासह दोघांवर हल्ला, पावणेचार लाख लुटले : १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अजनाडे येथील सुरेश भोसले आणि मुकेश भाेसले या दोघांनी काॅपरतार विक्री करण्याचे आमिष दाखवून मोहम्मद आरीफ सलीम पटेल (२८, रा. पिंपळगाव बसवंत) या भंगार व्यापाऱ्याला अजनाडे गावाजवळ बोलावले. व्यापाऱ्यासोबत अन्य एक सहकारीदेखील होता. व्यापारी आल्यानंतर सुरेश आणि मुकेश भोसले यांनी १५ साथीदारांच्या मदतीने त्यांच्यावर हल्ला केला. हाताबुक्क्यांनी तसेच लोखंडी राॅडने मारहाण करण्यात आली. यावेळी हल्लेखाेरांनी व्यापाऱ्याकडील ३ लाख ५० हजार रुपयांची रोकड, सोन्याची अंगठी, चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला.
जमावाकडून सुटका झाल्यानंतर भंगार व्यापारी पटेल यांनी मालेगाव गाठले. तेथील रमजानपुरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. सदर फिर्याद धुळे तालुका पोलीस ठाण्यात वर्ग झाली आहे. त्यानुसार सुरेश भोसले, मुकेश भाेसले, चॅम्पियन सिकेश, आकेश, भय्या, रघू, उलेश, संजय, गोरख आणि इतर चार ते पाच जण (सर्व रा. अजनाडे ता. धुळे परिसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सागर काळे करीत आहेत.