कांदा पीकावर करपा रोगाचे आक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 22:28 IST2019-11-29T22:28:17+5:302019-11-29T22:28:56+5:30
रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी हवालदिल

Dhule
मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरात कांदा पिकावर करपा रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. विभागाने उपाययोजना सुवचाव्यात अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
मालपूरसह परिसरात कांदा उत्पादन घेणारे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत. यावर्षी सुरुवातीच्या पाणी टंचाईमुळे कांदा उत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने यावर्षी कांदा लागवड केली. हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते. अशावेळी कांदा रोप टाकून कांदा लागवड केली आहे. सध्या बाजारात देखील बºयापैकी भाव सुरू असल्यामुळे येथील कांदा उत्पादक शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र अचानक करपा या रोगाचे कांद्यावर आक्रमण झाल्यामुळे पुन्हा शेतकºयांच्या स्वप्नांवर पाणी फिरताना दिसून येत आहे.
येथील कांद्याच्या परतीच्या तसेच सततच्या पावसाचा देखील मोठा फटका बसला आहे. अशाही परिस्थितीत येथील शेतकºयांनी योग्य रासायनिक खतांची मात्रा व महागडे नामांकीत कंपनीचे किटक नाशके, बुरशी नाशकांची फवारणी करुन कांदा पात चांगली वाढीस लागवल व कांद्याची पात जमल्यास कांदा चांगला पोसला जातो असा येथील शेतकºयांचा अनुभव आहे. मात्र या करपा रोगामुळे होत्याचे होताना दिसून येत आहे.
आता पावसाने चांगली उघडीप दिली असून उन्हाचे प्रमाण देखील योग्य आहे. अशावेळेला कांद्याचे पाणी तोडून या योग्य वातावरणामुळे जमलेल्या पाताचा रस खाली उतरुन कांदा पोसला जाणार होता. मात्र या करपामुळे संपूर्ण पात करपून वाकडी-तिकडी होत असल्यामुळे याचा कांदा उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. अगदी हातातोंडाशी घास आलेला असताना हे संकट उभे राहिल्यामुळे येथील शेतकºयांना कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची खुप गरत आहे.
यावर्षी खरीपातले कडधान्य पीक सुरुवातीच्या पावसाच्या अंतरामुळे वाया गेले तर भुसारातील बाजरी-ज्वारी, मका आदी पिके येथे २० जुलैच्या सुरु झालेल्या अखंड सतत तसेच परतीच्या पावसाने धुमाकुळ घातल्यामुळे कणसावरच कोंब फुटून सडून गेली तर कापसाचे यावर्षी येथे मोठे क्षेत्रफळ दिसून येत असून संपूर्ण कापूस भिजून गेला आहे. या कापसाला ओल्याव्याचे कारण व्यापारी सांगून मातीमो भावाने खरेदी करतात शिवाय मजुरी देखील जास्त लागत असून घरात देखील साठवता येत नसल्यामुळे मजुरी व भागभांडवलाचा खर्च वजा जाता हातात येथील शेतकºयांच्या काहीच शिल्लक रहात नसल्यामुळे संपूर्ण मदार कांदा पिकावर होती व बाजारातील आजचा भाव बघता खूप उमेद बाळगत असताना या करपा रोगाच्या आक्रमणामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला असून कृषी विभागाने येथे भेट देऊन शेतकºयांना उपाययोजना सुचवाव्यात, अशी येथील शेतकºयांची मागणी आहे.