शिंदखेड्यातील दोन पतसंस्थांची मुख्यमंत्री सहायता निधीत मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 21:29 IST2020-04-18T21:28:44+5:302020-04-18T21:29:24+5:30
सामाजिक बांधिलकी । ५६ हजार रुपयांचा निधी केला जमा

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : येथील दोन पतसंस्थांनी मुख्यमंत्री सहायता निधीत मदत जमा करुन आदर्श निर्माण केला आहे़
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतर्फे ५१ हजार रुपयांचा निधी देण्यात आला़ तर एसएमएफएस गर्ल्स हायस्कूल सेवकांच्या शारदा सहकारी पतसंस्थेने देखील पाच हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला़ शिंदखेडा येथील सहकारी संस्थेचे सहायक निबंधक संजय गीते यांच्याकडे दोन्ही पतसंस्थांनी धनादेशाद्वारे ही मतद दिली़ यावेळी क्रांतीज्योती पतसंस्थेच्या चेअरपर्सन रंजना सतिश पाटील, व्हा.चेअरपर्सन ज्योती दिपक माळी, सल्लागार प्रा. सतिश पाटील, प्रा. दीपक माळी, प्रा.परेश शाह, व्यवस्थापक संदीप साळुंखे, शारदा पतसंस्थेचे व्यवस्थापक भूपेंद्र लोहार, सहकार अधिकारी राजेंद्र दाऊळकर, प्रशांत डोलारे व कर्मचारी उपस्थित होते.