बांधकाम ठेकेदाराला मारहाण, नगरसेविकेच्या पतीवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:35 IST2021-05-14T04:35:28+5:302021-05-14T04:35:28+5:30
देवपुरात राहणारे ठेकेदार सचिन प्रभाकर दिक्षीत यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, प्रभाग दोन मधील सिमेंट काँक्रिट ...

बांधकाम ठेकेदाराला मारहाण, नगरसेविकेच्या पतीवर गुन्हा
देवपुरात राहणारे ठेकेदार सचिन प्रभाकर दिक्षीत यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, प्रभाग दोन मधील सिमेंट काँक्रिट रस्ता कामांचा ठेका त्यांना मिळाला असून तो सोडून द्यावा यासाठी नगरसेविका भारती माळी यांचे पती महापालिकेचे कर्मचारी असलेले अशोक सुकलाल माळी यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. या कामांची निविदा भरल्यापासूनच माळी हे दबाव टाकत होते. महिन्याभरापुर्वी माळी हे दिक्षीत यांच्या घरी आले होते. तेव्हाही शिवीगाळ करीत पोटात चाकू मारण्याचा दम त्यांनी भरला होता. फोनवर तसेच प्रत्यक्षात निविदा मागे घेण्यासाठी धमकावित होते. मात्र दिक्षीत त्यांना दाद देत नव्हते.
बुधवारी सकाळी शहर अभियंता कैलास शिंदे यांच्या दालनात सचिन दिक्षीत गेले असताना निविदेचा विषय काढून अशोक माळी यांनी पुन्हा दीक्षित यांना धमकाविले. शिवीगाळ करीत मारहाण केली. याप्रकरणी दीक्षित यांनी शहर पोलीस स्टेशन गाठले आणि फिर्याद दाखल केली. त्यानुसार अशोक माळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास हेड कॉन्स्टेबल गायकवाड करीत आहेत.