धुळे जिल्ह्यातील कलावंताचे सीईंओंच्या दालनासमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 12:49 IST2020-02-11T12:49:24+5:302020-02-11T12:49:40+5:30
तीन महिन्यांचे मानधन बॅकेत त्वरित जमा करण्याची मागणी, सीईओंशी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे

धुळे जिल्ह्यातील कलावंताचे सीईंओंच्या दालनासमोर ठिय्या
आॅनलाइन लोकमत
धुळे : मानधनपात्र लाभार्थ्यांचे तीन महिन्यांचे मानधन त्वरित बॅँक खात्यात जमा करावे, कलावंताचे दारिद्रय रेषेखालील यादीत नाव समाविष्ट करून बेघर व इतर योजनांचा लाभ मिळावा यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळातर्फे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांच्या दालनासमोर तासभर ठिय्या आंदोनल केले. यावेळी वारकऱ्यांनी केलेल्या नामजपामुळे परिसर दणाणून गेला होता. दरम्यान मानधनाचा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात येईल असे आश्वासन मिळाल्यानंतर कलावंतांनी आपले आंदोलन मागे घेतले.
आपल्या विविध मागण्यांसाठी खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळातर्फे सोमवारी सकाळी ११ वाजता टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी काढली. कल्याणभवनापासून निघालेली वारकऱ्यांची ही दिंडी शिवतीर्थ, जिल्हा रूग्णालयामार्गे जिल्हा परिषदेत पोहचली.
वारकºयांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला. यावेळी टाळमृदुंगाच्या गजरामुळे व नामजपामुळे जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून गेला होता.सीईओंच्या दालनासमोर आंदोलन सुरू करताच जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांची धावाधाव सुरू झाली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त हर्षदा बडगुजर, आदी सीईओंच्या दालनात पोहचले.
थोड्यावेळानंतर सीईओंनी वारकरी मंडळाच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी दालनात बोलविले. यावेळी मंडळातर्फे सीईओंना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, गेल दोन-तीन वर्षांपासून तालुका व जिल्हास्तरावर कलावंताना शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर शौचालय वावापराबाबत जाणीव जागृती करºयासाठी विविध योजनांचे लोककल्याणकारी कार्यक्रम मानधन तत्वावर मिळत नाही. यासंदर्भात पंचायत समिती कार्यालयात संपर्क साधला असता, कर्मचारी वृद्ध कलावंताशी अरेरावीने वागतात. सहाकरर्य करत नाही. त्यामुळे कलावंतावर अन्याय होत असल्याचे सांगण्यात आले.
सीईओंनी दखल घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर वारकºयांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले. ठिय्या आंदोलनात अनेक वारकरी महिला, पुरूष सहभागी झाले होते.