गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरात विविध ठिकाणी कृत्रिम तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:41 IST2021-09-15T04:41:21+5:302021-09-15T04:41:21+5:30

गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन वेळी गर्दी टाळण्यासाठी मनपाकडून शहरात ठिकठिकाणी मूर्ती विसर्जनाची व्यवस्था ...

Artificial lakes at various places in the city for immersion of Ganesh idols | गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरात विविध ठिकाणी कृत्रिम तलाव

गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरात विविध ठिकाणी कृत्रिम तलाव

गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन वेळी गर्दी टाळण्यासाठी मनपाकडून शहरात ठिकठिकाणी मूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली आहे़ त्या ठिकाणी मनपातर्फे तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात विसर्जन करावे. विसर्जन मिरवणुका काढण्यास येऊ नये़ विसर्जन पारंपरिक पद्धतीने करावे, विसर्जन ठिकाणी कमी वेळेत आरती करावी, भाविकांनी १०० टक्के शारीरिक अंतराचे पालन करावे, व मास्क लावावे आदी सूचनांचे काटेकोरपणे करावे असे आवाहन करण्यात आले आहे़

शहरात या ठिकाणी होणार आहे विसर्जन

संगमा चौक, गोळीबार टेकडी रोड, जय मल्हार कॉलनी लक्ष्मी नारायण लॉन्स जवळ, संभाप्पा कॉलनी चितोड रोड, शाळा नं.२८ चितोड नाका, दसेरा मैदान, फाशीपूल चौक, जे.क़े.ठाकरे हॉस्पिटल चौक, महाराणा प्रताप चौक, हॉटेल तरंग टी जवळ, शहर पोलीस चौकी़

आझाद नगर पोलीस स्टेशन : पारोळा चौफुली, गिंदोडिया चौक, गोल पोलीस चौकीसमोर, अरिहंत मंगल कार्यालय जवळ, कानुश्री मंगल कार्यालय जुने धुळे, किसनबत्तीवाला खुंट, शाळा नं.९ जवळ,जुने अमळनेर स्टॅड़ जयहिंद सिनियर कॉलेज- नेहरू चौक, दत्त मंदिर, सावरकर पुतळा, जीटीपी स्टॉप, एसएसव्हीपीएस कॉलेज चौक, डी. सी कॉलेज जवळ, संतसेना नगर

पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन : जिल्हा क्रीडा संकुल चौक वाडीभोकर रोड, वलवाडी टी.पॉईट, वाडीभोकर रोड स्वामी समर्थ पेट्रोल पंपासमोर, नकाणे रोड टी पॉईट, राजाराम पाटील नगर बोडो जवळ,मोराणकर बंगला चौक

चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन : अग्रवाल नगर येथील पंचक्रोशी परिसरातील मैदान, सप्तश्रृंगी नगर परिसरातील मोकळे मैदान, श्री सूर्यमुखी मारोती मंदिर जवळचे मोकळे मैदान, श्री़ अग्रसेन महाराज पुतळ्याजवळ गरबा मैदान अशा विविध ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे़

Web Title: Artificial lakes at various places in the city for immersion of Ganesh idols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.