शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हाधिकाºयांच्या वाहनावर आर्वीत दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 12:16 IST

मुंबई आग्रा महामार्ग : अपघातामुळे ग्रामस्थ आक्रमक

ठळक मुद्देआर्वीजवळ अपघातामुळे ग्रामस्थ रस्त्यावरनाशिककडे जाणाºया जिल्हाधिकाºयांच्या वाहनावर दगडफेकपोलीस अधीक्षकांसह प्रांताधिकारीही पोहचले आर्वीत

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मुंबई आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रोडवर उभ्या असणाºया दोघांना ट्रकने चिरडल्याची घटना धुळे तालुक्यातील आर्वी गावालगत घडली़ त्यात एक  जण जागीच ठार झाला असून एक गंभीर आहे़ ही घटना ताजी असताना त्याचवेळेस जिल्हाधिकाºयांचे वाहन तेथून जात असताना वाहनावर दगडफेकीचा प्रकार घडला़ यात वाहनाचा एक काच फुटला असून सुदैवाने दुखापत कोणालाही दुखापत झाली नाही़ घटनेची माहिती मिळताच याठिकाणी पोलीस अधीक्षक आणि प्रांताधिकारी तातडीने दाखल झाले़ वातावरण शांत असलेतरी तणाव मात्र कायम होता़ मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील धुळे तालुक्यातील आर्वी येथे असलेल्या सर्व्हिस रोडवर ही अपघाताची घटना शुक्रवारी सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास घडली़ यात एक जण जागीच ठार झाला तर एकास गंभीर दुखापत झाली़ यामुळे आर्वी ग्रामस्थ एकवटले होते़ परिणामी महामार्गावरील दोनही बाजुंची वाहतूक ठप्प झाली होती़ त्याचवेळेस जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे नाशिक येथील बैठकीसाठी जात होते़ जिल्हाधिकाºयांचे एमएच १८ एजे ७२७१ या क्रमांकाचे वाहन बघताच वाहनावर कोणीतरी दगड भिरकाविला़ त्यात वाहनाचा काच फुटल्याने काहीसा तणाव निर्माण झाला होता़ जिल्हाधिकाºयांनी समयसुचकता पाहून वाहन थांबविले आणि घटना काय घडली आहे, ग्रामस्थांचे काय म्हणणे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला़ अपघातातील मयत आणि जखमींना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ गंभीर असलेल्या रुग्णावर उपचार सुरु आहे़जिल्हाधिकाºयांच्या वाहनावर दगडफेक झाल्याची माहिती मिळताच तातडीने पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, प्रांताधिकारी गणेश मिसाळ घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला़ गावात शांतता असलीतरी तणाव मात्र कायम आहे़  

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात