शिरपूरला देशी बनावटीचे पिस्तूल घेवून जाणारा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 17:16 IST2020-06-23T17:16:07+5:302020-06-23T17:16:27+5:30

दोन जिवंत काडतूससह दुचाकी असा ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

Arrested for carrying a home-made pistol to Shirpur | शिरपूरला देशी बनावटीचे पिस्तूल घेवून जाणारा जेरबंद

शिरपूरला देशी बनावटीचे पिस्तूल घेवून जाणारा जेरबंद

शिरपूर : मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरपूर फाट्यानजिक दुचाकीने जाणाऱ्या एका तरूणाकडे देशी बनावटीचे पिस्तूल व २ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले़ याबाबत शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
२३ रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास महामार्गावरील शिरपूर फाट्यानजिक टोलनाक्याजवळ त्या तरूणास पोलिसांनी पकडले़
पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना एका गुप्त बातमीद्वारामार्फत हाडाखेडकडून धुळेकडे एक युवक पल्सर दुचाकी गाडीने जात असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती दिली़ पथकाने टोलनाकानजिक सापळा रचला़
दुचाकी गाडी क्रमांक एम़एच़१५-एफ़ए़-२६८० ने दीपक कौतिक पोळ (२०) रा़वाकी बु़ ता़चांदवड जि़नाशिक हा युवक एकटा येतांना दिसला़ त्याची चौकशी केली असता त्याने सुरूवातीला उडवाउडवीचे उत्तरे दिले़ त्यामुळे पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ३० हजार रूपये किंमतीचे देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल, १०० रूपये किंमतीचे २ जिवंत काडतुस व ३५ हजाराची दुचाकी गाडी असा एकूण ६५ हजार १०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ संशयित आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे़
पोक़ॉ़महेंद्र सपकाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक पोळ विरोधात शिरपूर पोलिस ठाण्यात बेकायदेशिररित्या देशी बनावटीचे पिस्तल बाळगल्याप्रकरणी आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
जिल्हा पोलिस अधिक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ़ राजु भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि हेमंत पाटील, सपोनि चंद्रकांत पाटील, हवालदार रामकृष्ण मोरे, महेंद्र सपकाळ, हेमंत पाटील यांनी ही कारवाई केली़

Web Title: Arrested for carrying a home-made pistol to Shirpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे