मारेकऱ्यांना अटक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 22:09 IST2020-07-15T22:09:26+5:302020-07-15T22:09:48+5:30
भोई समाज महासंघ : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

dhule
धुळे : येथील मोगालाईच्या भोई वाड्यातील जितेंद्र शिवाजी मोरे खून प्रकरणाचा तपास लावून मारेकºयांना त्वरीत अटक करावी, अशी मागणी धुळे जिल्हा भोई समाज महासंघाने केली आहे़
महासंघाने बुधवारी दुपारी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले़ धुळे शहरातील कालिका देवी मंदिराजवळ ११ जुलै रोजी रात्री जितेंद्र मोरे याचा अज्ञात मोरकºयांनी खून केला़ खुनाच्या गुन्ह्याला चार दिवस उलटूनही तपास लागलेला नाही़ या गुन्ह्याचा त्वरीत तपास केला नाही तर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा भोई समाज महासंघाने दिला आहे़
निवेदनावर महासंघाचे अध्यक्ष गणेश मोरे, सचिव वसंतराव तावडे, भटू धनराळे, शत्रुघ्न तावडे, किरण फुलपगारे, प्रविण फुलपगारे, डॉ़ प्रविण शिंगाणे, नाना वाडीले, रुपशे वाडिले, युवराज भोई आदींच्या सह्या आहेत़