९८१ रेशन दुकांनावर आधारलिकची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:32 IST2021-01-21T04:32:27+5:302021-01-21T04:32:27+5:30
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी जिल्ह्यात आधारलिंक मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी नागरिकांची गैरसाेय होऊ नये, यासाठी दुकानांतील ...

९८१ रेशन दुकांनावर आधारलिकची व्यवस्था
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी जिल्ह्यात आधारलिंक मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी नागरिकांची गैरसाेय होऊ नये, यासाठी दुकानांतील ई-पाॅस उपकरणांमधील ई-केवायसी व मोबाईल लिंकिंग सुविधेचा वापर करून आधार व मोबाईल क्रमांक लिंक करता येणार आहे. त्यासाठी धुळे शहर, ग्रामीण, शिंदखेडा, शिरपूर व साक्री तालुक्यातील ९८१ रेशनदुकानांवर व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अशी माहिती द्यावी
लाभार्थ्यांनी रेशन दुकानदाराकडे आधार कार्डची छायांकित प्रत व अंगठा द्यावा. जिल्ह्यात २ लाख १७ हजार लाभार्थ्यांचे आधार सिडिंग झालेले नाही. जे लाभार्थी अस्तित्वात नाही किंवा ज्यांनी २ ते ३ महिन्यांपासून धान्याची उचल केलेली नाही, त्या लाभार्थ्यांचा धान्य पुरवठा बंद करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहे.
२ हजार ७०० आधार लिंक
जिल्हा पुरवठा विभागाकडून रेशनकार्डला आधार लिंक करण्याचे आवाहन केले होते. आतापर्यत ९८१ रेशदुकानातील २ हजार ७०० ग्राहकांनी आधारलिंक केले आहे. तर धुळे शहर व तालुक्यातील ७९ हजार ९५७, साक्री तालुका ५९ हजार ७१, शिंदखेडा ४१ हजार ९९० तसेच शिरपूर तालुक्यातील ३३ हजार ६३२ असे एकून २ लाख १४ हजार ६५० रेशनकार्ड धारकांचे आधारलिंक अद्याप झालेली नाही. अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.