हल्लेखोरांचा बंदोबस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 22:34 IST2020-02-03T22:33:23+5:302020-02-03T22:34:06+5:30

शाळकरी मुलास मारहाण : अल्पसंख्यांक महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Arrange for the attackers | हल्लेखोरांचा बंदोबस्त करा

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : सीएए, एनआरसी आणि एनपीएच्या विरोधात भारत बंदच्या दिवशी घडलेल्या हिंसक घटनांचे पडसाद अजुनही उमटत असून सोमवारी एका शाळकरी मुलास मारहाण झाल्याने अल्पसंख्यांक समाजातील महिलांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आणि हल्लेखोरांचा त्वरीत बंदोबस्त करण्याची मागणी केली़
शंभर फुटी रोड हुडको भागातील काही महिला सोमवारी दुपारी शहरातून पायी चालत जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या़ या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शने केली़ त्यानंतर आस्मा, शबाना, रुकसाना, जरीना, सबीना, फरजान बी, रुकसाना बी, वहीदा आणि फरजान यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून निवेदन दिले़
निवेदनात म्हटले आहे की, २९ जानेवारीला भारत बंदच्या दरम्यान जी दगडफेक झाली, त्या घटनेचा राग मनात ठेवून सोमवारी सकाळी साडेसात वाजता अबुझर शेख (१३) हा विद्यार्थी मदरशाकडे जात असताना चाळीसगाव रोड आणि शंभर फुटीच्या रोडच्या चौकात दोन अज्ञात व्यक्तींनी त्याला मारहाण केली़ त्यांच्या हातातील दांडा आणि चाकुच्या सहाय्याने मारहाण करण्याचा प्रयत्न झाला़ त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ या लहान मुलास मारहाण करणाºया दोन व्यक्तींना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी़ तसेच अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे़
निवासी उपजिल्हाधिकाºयांशी चर्चा करताना सदर महिलांनी पोलीस फिर्याद घेत नसल्याचा आरोप केला़ तसेच या भागात काही गुंड प्रवृत्तीचे लोक दहशत निर्माण करीत असल्याने महिला, मुलींना असुरक्षित वाटू लागले आहे़ त्यामुळे त्यांचा त्वरीत बंदोबस्त करावा़ तसेच दंगलीमध्ये ज्या निर्दोष मुलांना पोलिसांनी पकडले आहे त्यांची सुटका करावी़
जिल्हाधिकाºयांनी सदर महिलांची समजूत काढताना सांगितले की, शाळकरी मुलास मारहाण करणाºयांचा शोध घेण्याच्या सूचना पोलिसांना देवून योग्य तो गुन्हा दाखल करण्यात येईल़ परंतु दगडफेक प्रकरणी ज्या तरुणांना अटक झाली आहे त्यांचा दंगलीत सहभाग असल्याचे प्राथमिक पुरावे पोलिसांकडे आहेत़ जे निर्दोष असतील त्यांच्या बाबतीत नव्याने पुराव्यांची पडताळणी केली जात आहे़ सोमवारी शाळकरी मुलास झालेली मारहाण आणि त्यानंतर अल्पसंख्यांक महिलांनी काढलेल्या मोर्चामुळे पोलिसांची काहीशी तारांबळ उडाल्याचे जाणवत होते़
भारत बंदच्या दिवशी घडलेल्या हिंसक घटनांची दाहकता चाळीसगांव रोड, १०० फुटी रोडवर आजही कायम आहे़ एकीकडे संशयितांची धरपकड मोहिम जोरात सुरू असली तरी प्रशासनाचा धाक दिसत नाही़ आजची घटना त्याचेच उदाहरण म्हणावे लागेल़ गुन्हा किरकोळ वाटत असला तरी घटना गंभीर आहे़ दोन जातीय दंगलींची धग सहन केलेल्या धुळे शहरात पुन्हा काही विपरीत घडू नये यासाठी प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने पाहण्याची आणि अधिक अलर्ट राहण्याची गरज व्यक्त होत आहे़
भारत बंद दरम्यान धुळ्यात झालेल्या हिंसक आंदोलन प्रकरणी शेख समीर शेख हनीफ (२५, रा़ मुल्ला कॉलनी), असलम अब्दुल गफुर मोमीन (२२, रा़ काझी प्लर्ॉ, वडजाई रोड), मोहम्मद हसन मोहम्मद याकुब (४८, रा़ अलशबाब शाळेजवळ, मिल्लत नगर) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे़ अटकेत असलेल्या संशयितांची संख्या आता ४० झाली़ १८ ते २० जणांची नाशिक कारागृहात रवानगी झाली़

Web Title: Arrange for the attackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे