वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:44 IST2021-09-16T04:44:33+5:302021-09-16T04:44:33+5:30
धुळे : जिल्ह्यात विविध वैद्यकीय महाविद्यालयात माॅप अप राउंडमध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज मंजूर करावेत, अशी मागणी भारतीय ...

वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करा
धुळे : जिल्ह्यात विविध वैद्यकीय महाविद्यालयात माॅप अप राउंडमध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज मंजूर करावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या विद्यार्थी आघाडीने केली आहे. याबाबत आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा शिंदखेड्याचे नगरसेवक सूरज रवींद्र देसले यांच्यासह विद्यार्थ्यांनी सोमवारी सहायक आयुक्त समाजकल्याण यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये बीएचएमएस, बीएएमएस, एमबीबीएस, बीडीएस किंवा अन्य मेडिकल अभ्यासक्रमात माॅप अप राउंडमध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृतीचे अर्ज समाजकल्याण कार्यालयात आले आहेत. माॅप अप राउंडमधील प्रवेश राज्य शासनाच्या सीईटी कक्षामार्फत झालेल्या प्रवेश फेरीतून दिलेले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना महाविद्यालय स्तरावर अथवा व्यवस्थापनाच्या कोणत्याही प्रवेश फेरीतून प्रवेश दिलेले नाहीत. त्यामुळे शिष्यवृत्तीचे अर्ज त्वरित मंजूर करावेत, अशी मागणी निवेदनात केली आहे.