नरडाणा औद्योगिक वसाहतीतील रस्ते कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 03:37 PM2018-03-18T15:37:51+5:302018-03-18T15:37:51+5:30

औद्योगिक विकास मंडळातर्फे केले जाणार काम : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ना-हरकत प्रमाणपत्र देण्यास मान्यता

Approval of road works in Nardana Industrial Colony | नरडाणा औद्योगिक वसाहतीतील रस्ते कामांना मंजुरी

नरडाणा औद्योगिक वसाहतीतील रस्ते कामांना मंजुरी

googlenewsNext
ठळक मुद्देशिरपूर पॉवर प्रा.लि. हा उद्योग पूर्णत्त्वास आलेला आहे. याठिकाणी वीज निर्मिती सुरू झाली आहे. तर वंडर सिमेंट या कंपनीच्या भूखंडावर कारखान्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. या शिवाय इतर उद्योगांसाठीदेखील हा रस्ता आवश्यक आहे. येथे असलेले उद्योग व कारखान्यात मालाची ने आण करणे व येथील परिसरात उद्योग वाढीसाठी येथील खराब रस्त्याची दुरुस्ती करून मजबुतीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय औद्योगिक विकास महामंडळाने घेतला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जिल्हा परिषद प्रशासनाकडे ना-हकरत प्रमाणपत्राची मागणी केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे  : नरडाणा औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या गाव रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. परिणामी, तेथील कंपन्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. यावर पर्याय म्हणून औद्योगिक  विकास महामंडळाने काम करण्याची तयारी दर्शविली आहे. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे औद्योगिक विकास महामंडळाने ना-हरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती. त्याला जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली आहे.  
शिंदखेडा तालुक्यातील वाघोदे, जातोडे शिवारात २२४ हेक्टर क्षेत्रावर नरडाणा एमआयडीसी टप्पा क्रमांक १ विकसित करण्यात येत आहे. तसेच बाभळे शिवारात टप्पा क्रमांक दोन अंतर्गत ४३१ हेक्टर क्षेत्र विकसित होत आहे. 
जातोडे शिवारात शिरपूर पॉवर प्रा.लि.अल्ट्राटेक सिमेंट व वंडर सिमेंट यासारखे मोठे उद्योग आहेत. असे असतानाही तेथील रस्त्यांची गेल्या काही दिवसात प्रचंड दुरवस्था झाली होती. येथील कंपन्या व काही कारखान्यांकडे ये-जा करण्यासाठी नरडाणा-मेलाणे-जातोडे हा रस्ता आहे. मात्र, गेल्या काही दिवसात या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारित हा रस्ता येत असून या रस्त्याची दुरुस्ती आतापर्यंत झाली नाही. 
औद्योगिक विकास महामंडळ निधी खर्च करणार 
या रस्त्याची एकूण लांबी २०.५० किलोमीटर एवढी आहे. तर रुंदी ५० मीटर डांबरी पृष्टभाग असलेली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ पासून नरडाणा औद्योगिक वसाहतीपर्यंत ५.२५० किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करणे आवश्यक आहे. हा रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आहे. मात्र, तूर्त तरी या रस्त्याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. दरम्यान औद्योगिक विस्ताराच्या दृष्टीने तसेच कंपन्यांमधील माल वाहतुकीच्या दृष्टीने या ठिकाणी रस्त्यांचा विकास होणे आवश्यक आहे. याकरिता  एमआयडीसी प्रशासनाने ५.२५० किलोमीटर रस्ते कामाची दुरुस्ती व मजबुतीकरणाचा निर्णय घेतला आहे. याकरिता औद्योगिक विकास महामंडळ निधी खर्च करणार आहे.  मात्र, रस्त्याचे मजबुतीकरणासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या ना-हकरत प्रमाणपत्र आवश्यक होते. 

Web Title: Approval of road works in Nardana Industrial Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.