अवघ्या दहा मिनिटात २५ विषयांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:35 IST2021-03-05T04:35:46+5:302021-03-05T04:35:46+5:30
येथील जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या सभेच्या व्यासपीठावर ...

अवघ्या दहा मिनिटात २५ विषयांना मंजुरी
येथील जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या सभेच्या व्यासपीठावर उपाध्यक्षा कुसुम निकम, समाजकल्याण समिती सभापती मोगरा पाडवी, महिला व बालकल्याण समिती सभापती धरती देवरे, आरोग्य सभापती मंगला पाटील, कृषी सभापती रामकृष्ण खलाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. उपस्थित होत्या.
सुरुवातीला विविध विषय समितींचा आढावा विभाग प्रमुखांनी घेतला. यात बांधकाम विषय समितीचा आढावा घेत असताना रस्त्याच्या कामांमध्ये साक्री तालुक्याचा पाच टक्के निधी कमी केल्यावरून विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.
सर्व विषयांना मंजुरी
स्थायी समितीच्या अजेंड्यावर तब्बल २६ विषय असल्याने, सर्वच विषयांवर सांगोपांग चर्चा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र एकाही विषयावर चर्चा न होता सर्वांना मंजुरी मिळाली. यात भटाणे-आभाणे रस्ता दुरुस्ती ४० लक्ष रुपये, बोरकुंड-तरवाडे रस्ता दुरुस्ती ३० लक्ष, खुडाणे-निजामपूर रस्ता दुरुस्ती ३० लक्ष, नकाणे-गोंदूर रस्ता सुधारणे ३० लक्ष, तरडी ते भावे रस्ता दुरुस्त करणे ३० लक्ष, बलकुवा ते अर्थे रस्ता दुरुस्ती ४० लक्ष, रामा ०४ ते मांडळ करवंद रस्ता दुरुस्तीसाठी ३० लक्ष ग्रामा १४ ते थाळनेर रस्ता दुरुस्ती करणे ४५ लक्ष रुपये, रामा ०४ ते विखरण मुखेड रस्ता दुरुस्ती ५० लक्ष रुपये अशा कोट्यवधीच्या कामांना अवघ्या दहा मिनिटात मंजुरी दिली. कोणत्याही विषयावर आक्षेप घेतला नाही. त्यामुळे सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याचे अध्यक्ष डॅा. तुषार रंधे यांनी जाहीर केले.