शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

धुळे जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 12:22 PM

जुलै ते डिसेंबरपर्यंत २१८ ग्रामपंचायतींची संपते आहे मुदत

आॅनलाइन लोकमतधुळे :१५ आॅगस्टपर्यंत मुदत संपत असलेल्या जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियुक्ती केली आहे. यात शिरपूर तालुक्यातील ९, शिंदखेडा तालुक्यातील ७ व साक्री तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. धुळे तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीवर अद्याप प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.महाराष्टÑ ग्रामपंचायत अध्यादेश २०२० अन्वये महाराष्टÑ ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १५१ मधील कलम (१) मध्ये खंड (क) मध्ये जर नैसर्गिक आपत्ती किंवा आणिबाणी, प्रशासकीय अडचणी, महामारी, आदींमुळे राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार पंचायतीच्या निवडणुका घेणे शक्य होत नसेल तर शासनास पंचायतीचा प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करता येईल अशी तरतूद आहे. जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून योग्य व्यक्तींची निवड करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेला आहे.धुळे जिल्ह्यात एकूण ५४१ ग्रामपंचायती आहेत. त्यात डिसेंबर अखेरपर्यंत २१८ ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. सध्या कोरोनाची महामारी सुरू असल्याने, मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीची निवडणूक घेणे शक्य नाही. त्यामुळे मुदत संपणाºया जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींवर मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांनी आज प्रशासकाची नियुक्ती केली आहे. उर्वरित ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीची अद्यापही प्रतीक्षा कायम आहे.या विस्तार अधिकाऱ्यांची केली नियुक्तीतालुकानिहाय ग्रामपंचायती व त्यावर नियुक्त प्रशासक असे-शिंदखेडा तालुका : दत्ताणे- शिक्षण विस्तार अधिकारी व्ही.बी.घुगे, डांगुर्णे/सोंडले-विस्तार अधिकारी (कृषी) वाय.पी.गिरासे, जातोडा-विस्तार अधिकारी एस. एच. मोरे, कर्ले-शिक्षण विस्तार अधिकारी डी.एस. सोनवणे, निरगुडी-विस्तार अधिकारी एस.के. सावकारे, वरूळ/घुसरे-विस्तार अधिकारी एस.ओ जाधव, जसाणे- विस्तार अधिकारी जी.डी.देवरे.शिरपूर तालुका : कुवे- एस.एस. पवार, घोडसगाव-वाय.एस.पाटील,चाकडू- व्ही.पी.राठोड, बाळदे-जी.पी.कुमावत, वाठोडे-वाय.एस.पाटील, नटवाडे-आर.झेड.मोरे, बाभुळदे-आर.के.गायकवाड, हिंगोणी बु.- एन.एम. सोनवणे, होळ-वैभव सोनार.साक्री तालुका :फाफोदे व मौजे भागापूर- जे.पी.खाडे.

टॅग्स :Dhuleधुळे