सर्वेक्षणासाठी १७ पथकांची केली नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:36 IST2021-04-24T04:36:31+5:302021-04-24T04:36:31+5:30
त्यात आदर्श विद्या मंदिर शाळेतील शिक्षक, जि. प. शाळेतील शिक्षक, बालवाडी सेविका व आरोग्य विभागातून आशासेविका यांचा सर्वेक्षणात सामावेश ...

सर्वेक्षणासाठी १७ पथकांची केली नियुक्ती
त्यात आदर्श विद्या मंदिर शाळेतील शिक्षक, जि. प. शाळेतील शिक्षक, बालवाडी सेविका व आरोग्य विभागातून आशासेविका यांचा सर्वेक्षणात सामावेश आहे. यासाठी एकूण १७ पथकांची नियुक्ती केली असून, त्यात ५१ कर्मचारी या कोरोनो सूक्ष्म सर्वेक्षणात सहभागी आहेत.
सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रामपालिकेने आवश्यक साहित्य दिले आहे. त्यात मास्क, थर्मल गन, ओक्सिमीटर, फेसशिल्ड, ग्लोज सॅनिटायझर याचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप पंचायत समिती सदस्य अशोक मुजगे, ग्रामपालिका जैताणे सरपंच कविता अशोक मुजगे, उप सरपंच कविता राकेश शेवाळे, संपर्क अधिकारी एस. अ. शिंदे, ग्रामविकास अधिकारी अनिल राठोड यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनही करण्यात आले.