वेतन अधीक्षकाची कायमस्वरूपी नेमणूक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:42 IST2021-09-08T04:42:50+5:302021-09-08T04:42:50+5:30
धुळे - जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार अनेक महिने झाले उशिरा होत असल्याने कायमस्वरूपी वेतन पथक अधीक्षकाची नेमणूक होऊन पगार ...

वेतन अधीक्षकाची कायमस्वरूपी नेमणूक करा
धुळे - जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार अनेक महिने झाले उशिरा होत असल्याने कायमस्वरूपी वेतन पथक अधीक्षकाची नेमणूक होऊन पगार सुरळीत झाले पाहिजेत, अशा मागणीचे निवेदन जिल्हा शिक्षक भारती संघटनेतर्फे शिक्षक भारती संघटनेचे संस्थापक व शिक्षक आमदार कपिल पाटील जळगाव येथे गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्यासाठी कांताई सभागृहात आले असता देण्यात आले.
जुनी पेन्शन योजना लागू करावी, कोरोना काळात सेवानिवृत्त शिक्षकांचे पेन्शनचे पैसे त्वरित मिळावेत, अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या होत्या. निवेदन देताना लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे, राष्ट्रसेवा दलाचे कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे, शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे, कार्यवाह प्रकाश शेळके, प्राथमिकचे राज्य सरचिटणीस भरत शेलार, राज्य संघटक सचिव अशपाक खाटिक, राष्ट्रसेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नुराभाऊ शेख आदी उपस्थित होते. धुळे जिल्हा शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील, कार्याध्यक्ष खेमचंद पाकळे, सचिव नानाभाऊ महाले, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष प्रा. पंकज पाटील, धुळे तालुका अध्यक्ष किरण मासुळे, साक्री तालुका अध्यक्ष जयवंत पाटील, माजी जिल्हाध्यक्ष लालाजी नांद्रे, विनोद रोकडे आदी उपस्थित होते.