व्यापाऱ्यांना एलबीटी विवरण पत्र देण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:36 IST2021-01-25T04:36:36+5:302021-01-25T04:36:36+5:30
महापालिका क्षेत्रात ६ जुलै २०१३ ते ३१ जुलै २०१५ पर्यंत एलटीबीची वसुली होत होती. या काळात ज्या व्यापाऱ्यांना एलबीटी ...

व्यापाऱ्यांना एलबीटी विवरण पत्र देण्याचे आवाहन
महापालिका क्षेत्रात ६ जुलै २०१३ ते ३१ जुलै २०१५ पर्यंत एलटीबीची वसुली होत होती. या काळात ज्या व्यापाऱ्यांना एलबीटी लागू हाेता. त्यांच्या विवरण पत्रांच्या पडताळणीचे (कर निर्धारणाचे) व कर वसुलीचे काम महापालिकेतर्फे सुरू करण्यात आले हाेते. मात्र, काेराेनामुळे त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. एलबीटीसाठी पात्र असणाऱ्या व्यापाऱ्यांनी थकित असलेला स्थानिक संस्था कर भरून विवरण पत्र व आवश्यक कागदपत्रे महापालिकेच्या जुन्या इमारतीतील स्थानिक संस्था कर विभागात जमा करावे. यापूर्वीही महापालिकेतर्फे संबंधितांना नाेटीस देण्यात आली आहे. तसेच काही व्यापारी संस्थांनी निर्धारणा आदेशावर हरकत घेतली आहे. त्यामुळे संबंधितांनी आवश्यक कागदपत्रांसह निर्धारणा करून घेणे गरजेचे आहे. जे व्यापारी विवरणपत्रे व कागदपत्रे जमा करणार नाही किंवा निर्धारणा तपासणीला हजर रहणार नाही. त्यांच्याकडून शास्ती वसूल केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.