शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

संकुचित विचार सोडून सामंजस्य राखले तर देशाचा सर्वांगीण विकास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 3:58 PM

शरद पवार : धुळ्यात महापालिका इमारत लोकार्पण प्रसंगी प्रतिपादन

ठळक मुद्देमहिलांना संधी देण्याचेही आवाहन दोन्ही कॉँग्रेसच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकाºयांची उपस्थितीधुळ्याच्या विकासासाठी सर्वांना एकत्र येण्याचा सल्ला

लोकमत आॅनलाईनधुळे : देशात संकुचित, मर्यादीत विचार वाढत आहे. तो विकासासाठी घातक आहे. देशात विविध जाती-धर्माचे लोक राहतात. त्या सर्वांमध्ये सामंजस्य निर्माण करण्याची काळजी घेतली पाहीजे. तसे झाले तर या सर्वांच्या एकजुटीतून शक्ती निर्माण होईल. त्याच्यातून देशाचा सर्वांगिण विकास होईल, असे मत राष्टÑवादी कॉँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी धुळ्यात मांडले.धुळे महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन रविवारी माजी केंद्रीय मंत्री व खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास आमदार अमरिशभाई पटेल, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार कुणाल पाटील, आमदार डी.एस. अहिरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर कल्पना महाले, आयुक्त सुधाकर देशमुख, काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, महानगर अध्यक्ष युवराज करनकाळ, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, महानगर अध्यक्ष मनोज मोरे यांच्यासह मनपाचे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी शरद पवार म्हणाले की, देशाच्या सर्वात प्रभावी प्रधानमंत्री कोण असे विचारले तर  इंदिरा गांधी असे एकच उत्तर येते. एक महिलेला शक्ती दिली तर ती काय करु शकते, हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणता येईल. त्यांनी जगात देशाचा नावलौकीक वाढविला. त्यामुळे भगिनींना संधी देणे ही तुमची व माझी जबाबदारी आहे. मी राज्यात असतांना महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांत ५० टक्के आरक्षण देण्याचा आणि वडिलोपार्जित मालमत्तेत मुलाएवढाच मुलीचाही हक्क असावा, हे दोन निर्णय घेतले होते. हा कायदा झाल्याने चित्र बदलले आणि  धुळ्याला आतापर्यंत तीन महिला महापौर मिळाल्यात, असेही पवार म्हणाले.विकासासाठी सर्वांनी एकत्र या विकासाबाबत धुळे अद्याप मागे का, याचा साकल्याने विचार करण्याची गरज आहे. निवडणुकांनंतर केवळ विरोधासाठी विरोध नको. तर शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येत चर्चा व प्रयत्न करावेत, असा सल्लाही शरद पवार यांनी यावेळी बोलताना दिला. तसे झाले तर धुळ्याचा झपाट्याने विकास होईल. यासाठी त्यांनी पुण्यानजीकच्या पिंपरी शहराचे उदाहरण दिले. आज या शहराचा आदर्श पुणे शहराने ठेवावा, असे म्हटले जाते. देशाच्या मध्यातून जाणारा मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग येथून जाणार आहे. शहराच्या  औद्योगिकरणासाठी येथे मोठे उद्योग कसे येतील, याचा विचार करा. तुमच्या विकासाच्या कामांसाठी मदत लागल्यास मी त्यासाठी तत्पर आहे, असे शरद पवारांनी स्पष्ट केले. 

 

टॅग्स :Dhuleधुळे