आणखी १३ जणांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 19:00 IST2020-06-28T18:59:55+5:302020-06-28T19:00:14+5:30
धुळे शहरात नऊ तर साक्री तालुक्यातील छाईल येथे चार पॉझिटीव्ह

dhule
धुळे : आणखी १३ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे़ साक्री तालुक्यातील छाईल येथील चार आणि धुळे शहरातील भाईजी नगर दोन, लोकरे नगर दोन, शिवाजी नगर एक, गव्हर्नमेंट सर्वंट कॉलनी वाडीभोकर रोड एक आणि हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथील तीन अशा नऊ रुग्णांचे अहवाल रविवारी सायंकाळी पॉझिटीव्ह आले़ धुळे जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९७९ झाली असून त्यापैकी ४८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत़ ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ ४३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत़