ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सभा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:38 IST2021-08-26T04:38:32+5:302021-08-26T04:38:32+5:30
सभेच्या सुरुवातीला शहीद जवान, मृत कोरोनायोद्धे व ज्येष्ठ नागरिक संघासाठी योगदान दिलेले कै. पोपटराव पाटील, कै. मधुकर बेहरे यांना ...

ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सभा उत्साहात
सभेच्या सुरुवातीला शहीद जवान, मृत कोरोनायोद्धे व ज्येष्ठ नागरिक संघासाठी योगदान दिलेले कै. पोपटराव पाटील, कै. मधुकर बेहरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सचिव प्रकाश दीक्षित यांनी जमा-खर्चाची माहिती दिली व प्रोसिडिंगचे वाचन केले. राहुल पवार यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी महत्त्वाच्या असलेल्या हेल्पलाइनबाबत माहिती दिली. यावेळी प्राचार्य भदाणे, शहा यांनीही मनोगत व्यक्त केले. नंदा बेहेरे यांनी त्यांच्या पतीच्या स्मृतिप्रीत्यर्थ ११ हजार रुपयांची देणगी दिली. चंद्रशेखर विसपुते यांनी सूत्रसंचालन केले. यतीन चौधरी यांनी आभार मानले. सभेसाठी वासुदेव उपकारे, डॉ. शिरीष नवगाळे, डॉ. राजेश जोशी, प्रा. शरद नाईक, प्रकाश पाटील, सर्जेराव अहिरे, रामदास कदम, अंजली नाईक, नंदा बेहेरे, राजेंद्र मुंदानकर, प्रल्हाद चौधरी यांची उपस्थिती होती.
मालमत्ता करात सूट मिळण्यासाठी प्रयत्नशील - नाईक
मालमत्ता करात ज्येष्ठ नागरिकांना सूट मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मनपा उपायुक्त शिल्पा नाईक यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक मदतीबाबतची माहिती त्यांनी यावेळी दिली.