श्रीकृष्ण प्रणामी मंदिरात वार्षिक महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 23:07 IST2020-06-21T23:07:31+5:302020-06-21T23:07:58+5:30
सोनगीर येथील सुमारे १५० वर्ष प्राचीन मंदिरात आज १०८ दिव्यांची महाआरती

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनगीर : येथील श्रीकृष्ण प्रणामी मंदिरात सुरू असलेल्या वार्षिक महोत्सवानिमित्त श्री ५ तारतम सागर साप्ताहिक पारायणाचे वाचन भाविकांकडून सुरु आहे. रविवार २१ रोजी संध्याकाळी ६ वाजता पारायणाची पूर्णहुती श्री ५ महामंगल पुरी धामचे आचार्य श्रीश्री १०८ सूर्यनारायणदासजी महाराज यांच्याहस्ते सोशल मिडिया माध्यमातून होणार आहे. यानिमित्त १०८ दिव्यांची महाआरती करण्यात येणार आहे.
तारतम सागर गं्रथाचे १८ हजार ७५८ ओवी आहेत. दररोज २५०० ते ३५०० ओवींचे वाचन होत असते. तारतम सागर ग्रंथाचे १८ भाग आहेत. दररोज सकाळी आरती करून पारायण वाचनास सुरुवात होत असते. पण सध्या देशावर कोविड-१९ महामारीचे मोठे संकट असल्याने बाहेर ठिकाणाहून कोणतेही स्थानकाहून आचार्य, संत येऊ शकत नसल्याने दररोज सोशल मीडियाच्या माध्यमातून पारायण शुभारंभ होत आहे. आतापर्यंत श्रीकृष्ण प्रणामी मंदिर शक्तीनगर दिल्लीचे गादीपती श्रीश्री १०८ परिन सखीजी महाराज, प्राणनाथ धाम डाकोर (गुजरात)चे गादीपती श्रीश्री १०८ सुमित कृष्ण ठाकूरजी महाराज, भावती पुरीधाम फुलपुर भैया (उत्तरप्रदेश) येथील गादीपती ब्रम्हानंद महाराज, श्री ५ पद्मावती पुरीधाम येथील संत गांधी पुजारी, प्राणनाथ ज्ञान केंद्र बोरीवली येथील विदुषी रचिता दीदी आदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पारायण शुभारंभ व प्रवचन केले.
मंदिरात सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन करून ५ साप्ताहिक पारायण सुरू आहेत. पारायणाच्या माध्यमातून मुक्ती मिळावी, हा उद्देश समोर ठेऊन वार्षिक ५ पारायण महोत्सवाचे नियोजन सोनगीर येथील कासार गल्लीतील सुमारे १५० वर्षांपूर्वीच्या प्राचीन श्रीकृष्ण प्रणामी मंदिरात करण्यात आले आहे.हा पारायण महोत्सव कार्यक्रम आचार्य श्रीश्री १०८ सूर्यनारायणजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. तसेच विदुषी रचिता दीदी यांचे देखील मार्गदर्शन मिळत आहे. सदर कार्यक्रमाचे संचालन मंदिर ट्रस्टचे सचिव अनिल कासार करीत आहे.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुजारी जगदीश कासार, संजय कासार, प्रशांत तांबट, बाईजुराज महिला मंडळाचे शोभा कासार, रुपाली कासार, भाग्यश्री कासार, शशी कासार, पुष्पाबाई कासार, बबिता तांबट, मंगला कासार, मीराबाई कासार, दीपाली कासार, शशिकलाबाई कासार, भारती कासार आदी परिश्रम घेत आहे.