धुळ्यातील स्ट्राँगरुमवर अनिल गोटेंचा वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 12:06 IST2019-10-23T12:06:06+5:302019-10-23T12:06:30+5:30
नगावबारी परिसर : मतमोजणीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त

धुळ्यातील स्ट्राँगरुमवर अनिल गोटेंचा वॉच
धुळे : विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर सर्व मतपेट्या जमा करण्यात आलेल्या नगावबारी परिसरातील स्ट्राँगरुमवर अपक्ष उमेदवार अनिल गोटे यांचा वॉच आहे़ सोमवारी सायंकाळी उशिराने मतपेट्या जमा होत असल्यापासून गोटे यांनी लक्ष ठेवण्यास सुरुवात केलेली आहे़ काही गैरप्रकार होऊ शकतो असा अंदाज गोटे यांना असल्यामुळे त्यांनी अशा प्रकारचे पाऊल उचलले आहे़ सोमवारी रात्री बराचवेळ ते याठिकाणी तंबू ठोकून होते़ मंगळवारी रात्रीही त्यांनी या ठिकाणी भेट दिली होती़ ते बराच वेळ थांबून होते़ आता बुधवारी देखील रात्री अनिल गोटे या स्ट्राँग रुमजवळ थांबणार असल्याचे सांगण्यात आले़