अंगणवाडीत बालकाचे संगोपन व संस्कार व्हावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:39 IST2021-08-27T04:39:13+5:302021-08-27T04:39:13+5:30
बोराडी ग्राम परिषदेच्या वतीने डिजिटल अंगणवाडीच्या उद्घाटन व इतर अंगणवाड्यांना साहित्य वाटपाप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. या वेळी प्रमुख ...

अंगणवाडीत बालकाचे संगोपन व संस्कार व्हावेत
बोराडी ग्राम परिषदेच्या वतीने डिजिटल अंगणवाडीच्या उद्घाटन व इतर अंगणवाड्यांना साहित्य वाटपाप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागुल, उपसरपंच राहुल रंधे, जिल्हा परिषद सदस्या जताबाई पावरा, शिरपूर पंचायत समितीचे सभापती सत्तारसिंग पावरा, तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र बागुल, उपसभापती धनश्री बोरसे, पंचायत समिती सदस्या सरिताबाई पावरा, वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलिमा देशमुख, शिरपूर एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी सचिन शिंदे उपस्थित होते.
डिजिटल अंगणवाडीचे उद्घाटन डॉ. तुषार रंधे यांच्या हस्ते झाले. तर परिसरात वृक्षारोपण व दोन मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलांचा सत्कार, स्तनदा मातांना बेबी केअर किट वाटप, बालिका जन्माचे स्वागत व अंगणवाड्यांना साहित्य वाटप करण्यात आले.
संजय बागुल म्हणाले की, १ ते ३० सप्टेंबरपर्यंत पोषण महासप्ताह सुरू करणार आहोत. त्यात विविध प्रकारचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
उपसरपंच राहुल रंधे म्हणाले की, ग्राम परिषदेच्या माध्यमातून अंगणवाडी व शाळांना भरपूर काही कामे करून देऊ त्यासाठी प्रस्ताव पाठवावा. प्रास्ताविक शिरपूर बालविकास प्रकल्प अधिकारी सचिन शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी पर्यवेक्षिका कांता पवार, पी.सी. पाटील, सेविका लक्ष्मी मालचे, सुनीता सगरे, जयश्री देवरे, प्रतिभा बडगुजर, सुधाबाई सोनार, प्रतिभा पाटील, प्रतिभा निकम, प्रतिभा ए. पाटील, रजूबाई पाटील, मदतनीस बेबीबाई पावरा, वैशाली महाजन, हिराबाई पाटील, रजना कोळी, कविता पावरा, सुमनबाई पाटील, सुनंदाबाई पाटील, निर्मला शिंदे, आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संदीप चौधरी व पी.सी. पाटील यांनी केले, तर आभार सुनीता सगरे यांनी मानले.