लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून माय-लेकीस जिवंत मारण्याचा प्रयत्न

By अतुल जोशी | Updated: January 24, 2024 19:30 IST2024-01-24T19:30:45+5:302024-01-24T19:30:53+5:30

सोनगीर पोलिस स्टेशनला एकाविरुद्ध गुन्हा दाखल

An attempt to kill mother and daughter for refusing to marry | लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून माय-लेकीस जिवंत मारण्याचा प्रयत्न

लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून माय-लेकीस जिवंत मारण्याचा प्रयत्न

धुळे : लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून एकाने मायलेकीच्या अंगावर  भरधाव  कार  आणत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच लेकीचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी सोनगीर येथे राष्ट्रीय महामार्गावर सकाळी सव्वापाच ते सहा वाजेच्या  सुमारास घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध सोनगीर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी शिक्षिकेने फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, मंगळवारी सकाळी सव्वापाच ते सहा वाजेच्या दरम्यान त्या मुंबई-आग्रा महामार्गावरील एका हाॅटेल समोर मुलीसह उभ्या  होत्या.  त्याठिकाणी आलेल्या तरूणास लग्नाचा नकार दिला. याचा राग आल्याने संशयित आरोपीने मायलेकींना जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नाने कारने जोरदार धडक दिली. तसेच मुलीचा गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी महिला शिक्षिकेच्या फिर्यादीवरून संशयिताविरुद्ध सोनगीर पोलिस स्टेशनला भादंवि कलम ३०७, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक विजय चौरे करीत आहेत.
 

Web Title: An attempt to kill mother and daughter for refusing to marry

टॅग्स :Dhuleधुळे