शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

अमरिशभार्इंच्या विजयाची हॅटट्रीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 9:55 PM

विधान परिषद निवडणूक : महाविकास आघाडीचे अभिजित पाटील यांना मिळाली अवघी ९८ मते

धुळे : विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत माजी मंत्री तथा भाजपचे उमेदवार अमरिशभाई पटेल यांनी ३३२ मते मिळवित विजयाची हॅटट्रीक केली आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांना अवघी ९८ मते मिळाली. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव यांनी निकालाची घोषणा करताच भाजप समर्थकांनी एकच जल्लोष केला.विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले होते. जिलह्यातील ४३७ पैकी ४३४ जणांनी मतदान केले होते. मतदानाची टक्केवारी ९९.३१ टक्के होती.गुरूवारी सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात मतमोजणी पार पडली. अवघ्या दोन तासात मतमोजणीची प्रक्रीया पार पडली. विजयी उमेदवाराला किमान २१६ मते मिळणे अपेक्षित असताना भाजपचे अमरिशभाई पटेल यांनी सर्वाधिक ३३२ मते मिळवित एकतर्फी विजय मिळविला. तर अभिजीत पाटील यांना केवळ ९८ मतांवर समाधान मानावे लागले. ४३० मते वैध तर ४ जणांचे मते अवैध ठरविण्यात आली. सकाळी ११ वाजून १३ मिनिटांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव यांनी अमरिशभाई पटेल यांच्या विजयाची घोषणा करीत त्यांना प्रमाणपत्र दिले. अमरिशभाई पटेल विजयी झाल्याचे समजताच भाजप समर्थकांनी एकमेकांना पेढा भरवून औपचारिक जल्लोष केला. यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, शिरपूरचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, महापौर चंद्रकांत सोनार, यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अहोरात्र प्रयत्न केले. मतदारांनीही विश्वास दाखविला. त्यामुळे सर्वाधिक मतांनी विजय मिळवता आल. यापुढेही विकास कामांना प्राधान्य देण्यात येईल. मदत करणा?्या सर्व मतदारांचे मनापासून आभार.- अमरिशभाई पटेल,नवनियुक्त आमदार, भाजप

टॅग्स :Dhuleधुळे