अमरिशभार्इंच्या विजयाची हॅटट्रीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 21:55 IST2020-12-03T21:55:05+5:302020-12-03T21:55:27+5:30
विधान परिषद निवडणूक : महाविकास आघाडीचे अभिजित पाटील यांना मिळाली अवघी ९८ मते

अमरिशभार्इंच्या विजयाची हॅटट्रीक
धुळे : विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत माजी मंत्री तथा भाजपचे उमेदवार अमरिशभाई पटेल यांनी ३३२ मते मिळवित विजयाची हॅटट्रीक केली आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांना अवघी ९८ मते मिळाली. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव यांनी निकालाची घोषणा करताच भाजप समर्थकांनी एकच जल्लोष केला.
विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले होते. जिलह्यातील ४३७ पैकी ४३४ जणांनी मतदान केले होते. मतदानाची टक्केवारी ९९.३१ टक्के होती.
गुरूवारी सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात मतमोजणी पार पडली. अवघ्या दोन तासात मतमोजणीची प्रक्रीया पार पडली. विजयी उमेदवाराला किमान २१६ मते मिळणे अपेक्षित असताना भाजपचे अमरिशभाई पटेल यांनी सर्वाधिक ३३२ मते मिळवित एकतर्फी विजय मिळविला. तर अभिजीत पाटील यांना केवळ ९८ मतांवर समाधान मानावे लागले. ४३० मते वैध तर ४ जणांचे मते अवैध ठरविण्यात आली. सकाळी ११ वाजून १३ मिनिटांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव यांनी अमरिशभाई पटेल यांच्या विजयाची घोषणा करीत त्यांना प्रमाणपत्र दिले. अमरिशभाई पटेल विजयी झाल्याचे समजताच भाजप समर्थकांनी एकमेकांना पेढा भरवून औपचारिक जल्लोष केला. यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, शिरपूरचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, महापौर चंद्रकांत सोनार, यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अहोरात्र प्रयत्न केले. मतदारांनीही विश्वास दाखविला. त्यामुळे सर्वाधिक मतांनी विजय मिळवता आल. यापुढेही विकास कामांना प्राधान्य देण्यात येईल. मदत करणा?्या सर्व मतदारांचे मनापासून आभार.
- अमरिशभाई पटेल,
नवनियुक्त आमदार, भाजप