शिरपुरात पटेल संस्थेतील शिक्षकांच्या आरोग्यासाठी ॲम्बिशन क्रीडा स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:43 IST2021-09-09T04:43:49+5:302021-09-09T04:43:49+5:30
आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या मैदानावर विविध क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ...

शिरपुरात पटेल संस्थेतील शिक्षकांच्या आरोग्यासाठी ॲम्बिशन क्रीडा स्पर्धा
आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या मैदानावर विविध क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकर चव्हाण, गोपाल भंडारी, सुभाष कुलकर्णी, फिरोज काझी, कैलासचंद्र अग्रवाल, शैलेंद्र अग्रवाल, संस्थेचे सीईओ डॉ.उमेश शर्मा, संचालिका डॉ. वैशाली पाटील, प्राचार्य डॉ. संजय सुराणा, डॉ. जे. बी. पाटील, डॉ. डी. आर. पाटील, डॉ. एस. बी. बारी, डॉ. एच. वाय. देवरे, डॉ. पी. सुभाष, निश्चल नायर, सिद्धार्थ पवार, जे. एल. चौधरी, जाकीर शेख, पी. व्ही. पाटील, आर. बी. पाटील, डॉ. नितीन हासवानी, डॉ. नवीन हासवानी, डॉ. अतुल शिरखेडकर, रवि बेलाडकर, डॉ. मुबिनोद्दीन यांच्यासह विविध शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, खेळाडू उपस्थित होते.
संस्थेच्या सर्व शाखांच्या क्रीडा विभागातील सर्व संकलित बातम्यांचे आकर्षक व सुंदर अल्बमचे अनावरण आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकात क्रीडा समन्वयक राकेश बोरसे यांनी संस्थेच्या विविध क्रीडा प्रकारात स्पर्धेत ४५ संघ सहभागी झाल्याचे सांगितले. ५५० पुरुष कर्मचारी व सर्वच महिला कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतल्याचे सांगितले.
संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी म्हणाले, आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलातील सर्व प्राचार्य मुख्याध्यापक, शिक्षक व इतर सर्व कर्मचारी यांच्या सुदृढ आरोग्यासाठी क्रीडा स्पर्धांना सुरुवात करून आमदार अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसापर्यंत विविध स्पर्धा घेण्यात येतील. निरोगी राहण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे. कोरोना काळात आपल्या संस्थेचे नऊ कर्मचारी आपल्यातून निघून गेल्याची बाब दुर्दैवी आहे. संस्थास्तरावर अमरिशभाई पटेल व भूपेशभाई पटेल यांच्या सूचनेनुसार काढण्यात आलेल्या ग्रुप इन्शुरन्समुळे असंख्य कर्मचाऱ्यांना १ ते २ लाख इन्शुरन्स रक्कम मिळाली, याचे समाधान आहे.
संस्थेच्या प्रयत्नाने ५१ योग गुरु तयार केले असून त्यांनी इतर सर्व कर्मचारी यांना योगाचे धडे नियमितपणे द्यावे. सर्व कर्मचारी शेवटच्या क्षणापर्यंत तंदुरुस्त कसे राहतील यावर आपण भर द्यावा. भार्इंच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी संस्थेचे असंख्य खेळाडू राष्ट्रीय, राज्य व विविधस्तरावर यशस्वी होतात ही संस्थेच्या दृष्टीने भूषणावह बाब आहे. कर्मचारी व विद्यार्थ्यांनी खेळ खेळले पाहिजे. आपले विद्यार्थी देखील आरोग्याच्या दृष्टीने सतर्क राहण्यासाठी प्रयत्न करावे.
संस्थेचे सचिव प्रभाकरराव चव्हाण म्हणाले, अमरिशभाई पटेल, भूपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने संस्थेच्या हितासाठी नेहमीच कल्याणकारी निर्णय घेतले जातात. कर्मचाऱ्यांसाठी विमा व आरोग्यासाठी अनेक हितावह निर्णय घेणारी पटेल संकुल हे राज्यातील उत्कृष्ट संस्था आहे.