Also money for farm lining in ‘Rohyo’; Good news for farmers | ‘रोहयो’मध्ये शेततळे अस्तरीकरणासाठीही पैसा; शेतकऱ्यांसाठी खुशखबर

‘रोहयो’मध्ये शेततळे अस्तरीकरणासाठीही पैसा; शेतकऱ्यांसाठी खुशखबर

धुळे : रोजगार हमी योजनेत आता शेततळ्यासोबतच अस्तरीकरणासाठीदेखील पैसा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आतापर्यंत शेततळे खोदकामासाठी केवळ अकुशल निधी मिळत होता; परंतु आता अस्तरीकरणासाठी कुशल निधी दिला जाणार आहे. यापूर्वी मंजूर कामांना याचा लाभ मिळणार नाही; परंतु नवीन मंजूर होणाऱ्या कामांना अस्तरीकरणाचा लाभ मिळणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत शेततळ्यासोबतच आता प्लास्टिक अस्तरीकरणासाठीही खर्च दिला जाणार आहे. शेततळे खोदण्यासाठी उपलब्ध असलेल्या अनुदान योजनेत प्लास्टिक अस्तरीकरणाचा समावेश करण्यात आला आहे. रोजगार हमी योजनेत मजुरीचा दर २३८ रुपये आहे. इनलेट व आऊटलेटविरहित मजुरांद्वारे होणाऱ्या खोदाईचे आर्थिक मापदंड बघता ३० मीटर लांबी, ३० मीटर रुंदी आणि ३ मीटर खोलीच्या शेततळ्यासाठी एकूण ५ लाख ६८ हजार ३८० रुपये उपयोजना डोंगरी भागासाठी गृहीत धरण्यात आली आहे. तसेच इतर क्षेत्रासाठी ही रक्कम ५ लाख १४ हजार ८९५ रुपये अपेक्षित आहे. रोजगार हमी योजनेच्या अप्पर मुख्य सचिवांनी जारी केलेल्या आदेशानुसार शेततळ्यात आता अस्तरीकरणाचा भागदेखील समाविष्ट करण्यात आला आहे. त्यासाठी कृषी विभागाने निश्चित केलेल्या नियमावलीचे निकष लावले जाणार आहेत.

रोजगार हमी योजना विभागाच्या या निर्णयामुळे अस्तरीकरणाच्या कामांबाबत होत असलेल्या खर्चाच्या बाबी कशा व कोणत्या पद्धतीने बसवायच्या याविषयीचा संभ्रम दूर होण्यास मदत होणार आहे. राेहयोमध्ये शेतकरी आधी स्वखर्चातून अस्तरीकरणाचा समावेश केल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय दूर होईल. प्लास्टिक पेपर टाकल्यामुळे पाणीसाठा जास्त काळ उपलब्ध होतो. उत्पादन व उत्पादकता वाढीसाठी अस्तरीकरण महत्त्वाचे असते.

शेततळे अस्तरीकरणाचे मापदंड असे

आकार अकुशल कुशल

३०x३०x३ २९५८२ १२६५४५

३०x२५x३ २५६६५ १०९७९१

२५x२५x३ २२२४४ ९५१५५

२५x२०x३ १८८२३ ८०५१९

२०x२०x३ १५६२० ६६८१७

२०x१५x३ ११९७४ ५१२२२

१५x१५x३ १०७१५ ४५८३६

१०x१०x३ ६७७४ २८९८०

Web Title: Also money for farm lining in ‘Rohyo’; Good news for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.